आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानातील सर्वात मोठा गुरुद्वारा, एकेकाळी इंग्रजांनी केला होता गोळीबार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना पाक प्रशासनाने पंजाब येथील ननकाना साहिब गुरुद्वाराचे दर्शन घेण्यापासून अडवले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, बिसारिया यांनी पाकिस्तानकडून या दर्शनासाठी आधीच परवानगी काढली होती. तरीही त्यांना प्रवेश नकारण्यात आला आहे. ननकाना साहिब गुरुद्वारा जगभरातील शिखांसाठी सर्वात मोठ्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. 97 वर्षांपूर्वी इंग्रजांनी याच ठिकाणी नरसंहार केला होता. त्यामध्ये 70 जणांचा जीव गेला. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ननकाना साहिब जिल्ह्यातच हा गुरुद्वारा आहे. त्यांचा जन्म याच शहरात झाला होता.


इंग्रजांनी सभेवर केला होता गोळीबार...
- 1921 मध्ये जेव्हा ब्रिटिशांची राजवट असताना त्या जुल्मी राजवटीविरोधात असहकार चळवळ सुरू होती. त्याचवेळी स्थानिकांनी ननकाना साहिब गुरुद्वाऱ्यात शांततापूर्वक सभा आयोजित केली होती. 
- सभा सुरू असताना इंग्रजांचे सैनिक घटनास्थळी पोहोचले आणि गोळीबार सुरू केला. यात 70 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. 
- जलियांवाला बाग हत्याकांडच्या दोन वर्षांतच हा नरसंहार घडला होता. यावरून इंग्रज सरकारविरोधात अख्खा देश पेटून उठला होता.


आसपास आहेत 9 गुरुद्वारे...
- ननकाना साहिब गुरुद्वारा परिसराचे जुने नाव 'राय-भोई-दी-तलवंडी' असे होते. त्यावेळी या परिसरात राय बुलर भट्टीचे शासन होते. 
- गुरू नानकदेव यांच्या आध्यात्मिक रुचींविषयी सर्वात आधी त्यांची बहिण नानकी आणि राय बुलर भट्टी यांनीच ओळखले होते. 
- राय बुलरने तलवंडी शहराजवळ 20 हजार एकर जमीन गुरू नानकदेव यांना भेट म्हणून दिली होती. तेव्हापासूनच हा परिसरास 'ननकाना साहिब' या नावाने ओळखला जाऊ लागला. 
- महाराजा रणजीत सिंग यांनी गुरू नानकदेव यांच्या जन्मस्थळी गुरुद्वारा निर्मिती सुरू केली. त्यानंतरच ननकाना साहिब गुरुद्वारा उदयास आला. 
- साहिबच्या जवळपास मुख्य गुरुद्वारासह इतर 9 गुरुद्वारे आहेत. हे सर्वच गुरुद्वारे नानकदेव यांच्या जीवनाचे महत्वाचे पैलू आहेत.

 

पुढे पाहा, पाकिस्तानातील सर्वात मोठ्या गुरुद्वाराचे आतील फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...