आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद - पाकिस्तानात कुप्रसिद्ध असलेल्या या रस्त्याला हिरा मंडी आणि इंग्रजीत Diamond Market असे म्हटले जाते. लाहोरमध्ये असलेल्या या बाजारात दिवसभर कुणी फिरत सुद्धा नाही. मात्र, रात्रीचे 11 वाजताच या बाजाराच्या रस्त्यांवर मैफिल जमते. पाकिस्तानची सर्वात जुनी वेश्या वस्ती हिरा मंडी येथे मध्यरात्री उशीरानंतरही रोषणाई कमी होत नाही. या भागात अफगाणिस्तानच्या अल्पवयीन मुली सुद्धा अवघ्या अवघ्या 600 रुपयांत विकल्या जातात.
- पाकिस्तानात प्रॉस्टिट्युशन बेकायदा आहे. तरीही रात्री या रस्त्यावर उघडपणे वेश्या फिरताना दिसून येतात. लाहोरच्या ऐतिहासिक बादशाही मशीदीपासून 700 मीटर दूर असलेल्या या भागात स्वतःला शरीफ म्हणणारे लोक दिवसा फिरतही नाहीत. रात्री 11 वाजल्यानंतर मात्र, हा रस्ता गजबजलेला दिसतो.
- 2003 च्या सरकारी आकडेवारीनुसार, पाकिस्तानात 20 हजारांहून अधिक अल्पवयीन मुली वेश्या व्यवसायात आहेत. लाहोर व्यतीरिक्त कराची, फैसलाबाद आणि मुल्तानमध्ये सुद्धा उघडपणे देहविक्रय सुरू आहे. कराचीतील नेपियर रोड, रावळपिंडीतील कासिम गल्ली हे शेजारील देशाचे असे भाग आहेत ज्या ठिकाणी रात्रीच्या मैफिली भरतात.
- डिपॉल विद्यापीठातील ‘इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स लॉ इंस्टीट्युट’ने 2001 मध्ये एक अहवाल जाहीर केला. त्यानुसार, येथे अफगाणिस्तानच्या तरुणी आणि अल्पवयीन मुली सुद्धा अवघ्या 600 रुपयांमध्ये खुलेआम विकल्या जातात.
- हिरा मंडी खूप जुनी आहे. या भागाचे नाव सुद्धा महाराजा रंजीत सिंग यांच्या कारकिर्दीतील आहे. महाराजा रंजीत सिंग यांचे मंत्री हिरा सिंग यांचे नाव या बाजाराला देण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पाकच्या सर्वात कुप्रसिद्ध हिरा मांडीचे आणखी काही फोटो...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.