Home | International | Pakistan | The Secret Life Of Transgenders Society In Pakistan

देहविक्रय करून पोट भरतोय पाकिस्तानातील हा समुदाय, मांडल्या व्यथा

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 09, 2018, 02:01 PM IST

पाकिस्तानातील तृतीय पंथीयांकडे भीक मागणे आणि देहविक्रय करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

 • The Secret Life Of Transgenders Society In Pakistan

  इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात नुकतेच एका ट्रान्सजेंडरने वृत्त निवेदन केले. कोहिनूर या खासगी वृत्तवाहिनीने ट्रान्सजेंडर मार्विया मलिक हिला नोकरी दिली. पाकिस्तानात तृतीयपंथीयांचे आयुष्य अतिशय कठिण आहे. पाकिस्तानात ट्रान्सजेंडरवर बलात्कार आणि मर्डरसह छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. तेथील तृतीय पंथीयांकडे भीक मागणे आणि देहविक्रय करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.


  - 2012 मध्ये पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना समान नागरी अधिकार देण्याचे आदेश जारी केले.
  - त्यांना सामान्य नागरिकांसारखीच वागणूक, प्रॉपर्टीमध्ये भागिदारी आणि मतदानाचा अधिकार देखील मिळाला.
  - यापूर्वी 2009 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना तिसरे लिंग (तृतीयपंथी) अशी अधिकृत ओळख दिली. तरीही त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि भेदभाव अद्याप थांबलेले नाहीत.
  - समाजात आजही सन्मानाची वागणूक मिळत नाही. त्यामुळे, ट्रान्सजेंडर भीक मागून किंवा वेश्यालयात देहविक्रय करून आपले पोट भरत आहेत.


  तृतीयपंथीयांना लक्ष्य करणाऱ्या टोळ्या सक्रीय
  - पाकिस्तानचे आदिवासी आणि ग्रामीण भागात तृतीयपंथीयांवर अत्याचार केले जातात. खास ट्रान्सजेंडरला लक्ष्य करून बलात्कार आणि हत्या करणाऱ्या टोळ्या देखील सक्रीय आहेत.
  - ऑनलाइन संस्था नेटवर्क ट्रान्स अॅक्शन खैबर पख्तूनख्वाने सोशल मीडियावर या विरोधात एक मोहिम छेडली. त्यामध्ये या प्रांतातील ट्रान्सजेंडर विरोधी टोळ्यांचा उल्लेख केला जातो.
  - गेल्या 2 वर्षांत या टोळ्यांनी 45 तृतीय पंथियांची हत्या केली. तसेच कित्येक ट्रान्सजेंडरवर बलात्कार झाले. पोलिसांमध्ये सुद्धा त्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नाहीत.


  पुढील स्लाइड्सवर पाहा, पाकिस्तानात तृतीयपंथीयांची दैनंदिनी दाखवणारे फोटो...

 • The Secret Life Of Transgenders Society In Pakistan
 • The Secret Life Of Transgenders Society In Pakistan
 • The Secret Life Of Transgenders Society In Pakistan
 • The Secret Life Of Transgenders Society In Pakistan
 • The Secret Life Of Transgenders Society In Pakistan

Trending