आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघोटकी - पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एक दरगाह मुलींचे बळजबरी धर्मपरिवर्तन करून पुन्हा चर्चेत आहे. निशा नावाच्या पीडित मुलीला या ठिकाणी अपहरण करून आणण्यात आले. तसेच तिचे धर्म सुद्धा बदलण्यात आले. एवढेच नव्हे, तर तिच्या मर्जीविरुद्ध निकाह सुद्धा लावण्यात आला. हा समस्त प्रकार भरचंडी शरीफ नावाच्या दर्ग्यात झाला आहे. धर्मपरिवर्तनाचा हा अड्डा स्थानिक कथित धर्मगुरू आणि नेता मिया मिठ्ठू चालवतात. त्याचाच भाऊ पीर मिया शमा या दर्गाहचा संचालक आहे.
200 हून अधिक मुलींचे धर्मपरिवर्तन
- ही दर्गाह सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यात भरचंडी परिसरामध्ये आहे. हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांना बळजबरी येथे मुस्लिम केले जाते.
- या धर्मपरिवर्तनाच्या अड्ड्याचे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने सुद्धा प्रसिद्ध केले. त्यामध्ये मिया मिट्ठू आणि त्याचा भाऊ पीर मिया शमा यांची मुलाखत होती.
- दोन्ही भावांनी ख्रिस्ती मुलींचे धर्मपरिवर्तन करत असल्याचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले होते. तसेच 200 हून अधिक हिंदू मुलींना मुस्लिम केल्याचे सांगितले होते.
- या सर्व मुलींचे धर्मपरिवर्तन आणि निकाह सुद्धा त्यांच्या मर्जीने करण्यात आले. त्यांच्यावर बळजबरी करण्यात आली नाही असा दावा त्यांनी केला.
शारीरिक शोषणाचेही आरोप
- येथील मौलवीवर अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे आरोप लागले आहेत. हिंदू आणि ख्रिस्ती मुलींचे अपहरण करून त्यांचे शारीरिक शोषण केले जाते. यानंतर त्यांचा धर्म बदलून निकाह करून दिला जातो.
- या प्रकरणी पाकिस्तान तहरीक ए इन्साफचे नेते आणि सिंधच्या कंधकोट येथील डॉ जसपाल छाबडिया यांनी सवाल उपस्थित केले होते.
- त्यांनी येथील 13 वर्षीय मुलीचे अपहरण, बळजबरी धर्मपरिवर्तन आणि निकाहच्या विरोधात आवाज उठवला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या धर्मपरिवर्तनाच्या अड्ड्याचे आणखी फोटो...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.