Home | International | Pakistan | Toughest Woman Of Pakistan Confronted 200 Armed Men With Her AK47 Rifle

200 सशस्त्र गुंडांचा AK-47 घेऊन सामना करणाऱ्या रणरागिणी, रोमहर्षक सत्यकथा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 11, 2018, 12:02 AM IST

वदेरी नाझो धरीजो उर्फ मुख्त्यार पाकिस्तानच्या सर्वात टफ महिला म्हणूनही ओळखल्या जातात.

  • Toughest Woman Of Pakistan Confronted 200 Armed Men With Her AK47 Rifle

    इंटरनॅशनल डेस्क - वदेरी नाझो धरीजो उर्फ मुख्त्यार पाकिस्तानच्या सर्वात टफ महिला म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांच्या आयुष्यावर काढलेला चित्रपट गतवर्षी ऑस्करमध्ये पोहोचला होता. पण, पुरस्कार मिळवू शकला नाही. नाझो सिंध प्रांतातील काझी अहमद गावातील रहिवासी आहे. ऑगस्ट 2005 मध्ये तिची जमीन आणि घर हिसकावण्यासाठी शत्रूंनी 200 सशस्त्र गुंड पाठवले होते. तेव्हा नाझो आपल्या बहिणींसह एके-47 रायफली घेऊन त्यांच्याशी भिडली होती. तीही अशी की एकही शत्रूला घरात घुसणे तर दूर पाय सुद्धा ठेवू शकला नाही. तिचे धाडस पाहून 200 गुंडांनी पोबारा केला होता.


    वडिलांनीच दिले रायफलचे प्रशिक्षण...
    > नाझोचे वडील हाजी खुदा बक्श यांनी 4 लग्न केले होते. त्यामुळेच, संपत्तीच्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता. नाझोचे भाऊ तिचे शत्रू बनले होते.
    > वडिलांच्या मृत्यूनंतर खुदाबक्श आपली सर्वात मोठी मुलगी नाझो आणि इतर मुलींसोबत राहायला आले. त्यांनी आपल्या वडिलोपार्जित संपत्तीवर नियंत्रण मिळवले होते. ही गोष्ट मुलांना खटकली आणि भाऊ-बहिणी कट्टर शत्रू बनले.
    > खुदा बख्शला तीन मुली होत्या. त्यापैकी सर्वात मोठी नाझो होती. त्यांनी नाझोसह इतर मुलींना आपल्या मुलांसारखेच ठेवले होते. त्यांना विद्यापीठात पद्वी पर्यंतचे शिक्षण दिले. एके-47 रायफल चालवणे देखील शिकवले.


    काय घडले त्या रात्री..?
    > तर दुसरीकडे, आपला बाप खुदा बक्श आणि बहिणींचा काटा काढून संपत्ती हिसकावण्यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांची साथ घेतली. खुदा बक्शसोबत राहणारा एकमेव मुलाला फेक एनकाउंटरमध्ये ठार मारले. तसेच वडिल खुदा बक्शला खोट्या आरोपांत जेलमध्ये डांबले.
    > याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ऑगस्ट 2005 मध्ये शत्रू भावंडांनी रात्री नाझोच्या घरावर 200 सशस्त्र गुंड पाठवले. शत्रूंनी घराबाहेर गोळीबार करून धमकावणे सुरू केले. मात्र, नाझो घाबरवणाऱ्यांपैकी मुळीच नव्हती.
    > आपली वडिलोपार्जित जमीन कुठल्याही परिस्थितीत वाचवणार अशी शपथ घेतलेल्या नाझोने आपल्या बहिणींच्या हातात रायफली देऊन स्वतः एके-47 घेत घराबाहेर निघाली. तसेच साऱ्या बहिणींना शत्रूंवर बेछूट गोळीबार सुरू केला. आपल्याकडे गोळ्या कमी असल्याची जाणीव असतानाही ती घाबरली नाही आणि सलग गोळीबार सुरूच ठेवला.
    > इतक्या जबरदस्त प्रतिहल्ल्यास शत्रू उत्तर देऊच शकले नाही. अखेर आपल्या बंदूका देखील त्याच ठिकाणी सोडून पळ काढला. सकाळपर्यंत अख्ख्या पाकिस्तानात नाझो आणि तिच्या बहिणींच्या धाडसाचे कौतुक सुरू झाले.


    आता ऑस्करमध्ये जातेय बायोपिक
    > गोळीबाराच्या 5 वर्षांनंतर नाझोने कायदेशीर लढा जिंकला आणि स्वतः त्या संपत्तीची खरी मालकीन बनली. ती आता शेती करत आहे. तिच्या गावासह आसपासच्या अनेक गावांमध्ये लोक तिचे नाव आदराने घेतात. शत्रूंनीही आपल्या कृत्यानंतर समाजात जाहीर माफी मागितली.
    > तिच्यावर 'माय प्युअर लॅन्ड' नामक हॉलिवुडपट सुद्धा रिलीज झाला. ब्रिटिश-पाकिस्तानी सॅम मसूद यांच्या दिग्दर्शनात बनलेला आणि अॅन्जेलिना जोलीचा प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झाला होता.


    पुढील स्लाइड्सवर पाहा, नाझो यांचे आणखी काही फोटो...

  • Toughest Woman Of Pakistan Confronted 200 Armed Men With Her AK47 Rifle
  • Toughest Woman Of Pakistan Confronted 200 Armed Men With Her AK47 Rifle
  • Toughest Woman Of Pakistan Confronted 200 Armed Men With Her AK47 Rifle
  • Toughest Woman Of Pakistan Confronted 200 Armed Men With Her AK47 Rifle

Trending