आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या दहशतवाद धार्जिण्या भूमिकेवर अमेरिका संतप्त; रोखली जाणार 1600 कोटींची रसद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - अमेरिकेकडून पाकिस्तानला दहशतवाद विरोधी कारवायांसाठी दिली जाणारी 1628 कोटी रुपयांची रसद आता थांबवली जाण्याची शक्यता आहे. दहशतवाद धार्जिण्या पाकिस्तान सरकार आणि लष्कराकडून दहशतवाद्यांवर केल्या जाणाऱ्या नरमाईवर अमेरिका संतप्त आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाने शुक्रवारी कठोर शब्दात पाकच्या नरमाईचा निषेध केला. तसेच दहशतवाद्यांवर नरमाइची गंभीर दखल घेत पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी निधीवर लगाम लावण्याचे संकेत दिले.

 

दहशतवाद्यांना शरण देतेय पाकिस्तान - ट्रम्प
- न्यूयॉर्क टाइम्सचा दाखला देत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये आता खूप मोठी दरी पडली आहे.
- ट्रम्प यांनी नुकतेच एका भाषणात पाकिस्तान अराजकता, हिंसाचार आणि दहशतवाद पसरवणाऱ्यांना आश्रय देत असल्याचे उघडपणे म्हटले. तसेच दोन्ही देशांमध्ये संबंध खराब होत असल्याचे सुद्धा सांगितले.
- पाकिस्ताना अमेरिकेकडून दरवर्षी दहशतवाद विरोधी कारवायांसाठी अब्जावधींची रक्कम दिली जाते. मात्र, दहशतवाद्यांवर नरमाई करणाऱ्या पाकिस्तानला खरोखर या निधीची गरज आहे का? असा विचार अमेरिकेत गांभीर्याने केला जात आहे.
- अमेरिकेने 2002 पासून आतापर्यंत पाकिस्तानला दहशतवाद विरोधी कारवायांसाठी 33 अब्ज अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 2.11 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

बातम्या आणखी आहेत...