Home | International | Pakistan | Weird Reason Pakistan Has Every Time They Ban Indian Movie Release

पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर Ban लावताना देतात इतकी विचित्र कारणे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 03, 2018, 03:44 PM IST

पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी लावण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

 • Weird Reason Pakistan Has Every Time They Ban Indian Movie Release

  इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी लावण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने नुकतेच आणखी एक भारतीय चित्रपट 'वीरे दी वेडिंग' बॅन केला आहे. पूर्णपणे स्त्री केंद्रीत या चित्रपटात असभ्य आणि अभद्र भाषा वापरण्यात आली असे कारण देण्यात आले आहे. यामध्ये करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया मुख्य भूमिकेत आहेत. 1 जून रोजी प्रदर्शित झालेला वीरे दी वेडिंग पाकिस्तानात बॅन करण्यात आलेला या वर्षातील तिसरा चित्रपट ठरला आहे.

  राजी चित्रपटावर देखील बंदी
  भारतात 100 कोटींची कमाई करणारा मेघना गुलजार निर्मित चित्रपट राजी सुद्धा पाकिस्तानात प्रतिबंधित करण्यात आला. 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात एका काश्मिरी तरुणीला गुप्तहेर म्हणून पाठवण्यात आले होते. त्या मुलीची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. पण, पाकिस्तानला सत्यघटनेचा देखील विसर पडल्याचे दिसून आले आहे.


  पाकिस्तानचा उल्लेख नसलेला चित्रपटही बॅन
  मनोज बाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत अय्यारी चित्रपटात पाकिस्तानचा उल्लेखही नव्हता. हा चित्रपट भारतात होणाऱ्या भ्रष्टाचारावर होता. परंतु, यामध्ये भारतीय लष्कराची पार्श्वभूमी दाखवल्याने पाकिस्तानला ते आवडले नाही. त्यामुळेच पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने त्यावर बंदी लावली आहे.


  पुढे भाईचा चित्रपट सुद्धा बॅन, वाचा धर्म, प्रतिमेची विविध कारणे...

 • Weird Reason Pakistan Has Every Time They Ban Indian Movie Release

  ईदच्या नावे बंदी
  भारतासह जगभरात भाई या नावाने ओळखल्य जाणाऱ्या सलमान खानचा चित्रपट रेस-3 येत्या 15 जूनला ईदनिमित्त रिलीज होत आहे. पण, पाकिस्तानात हा चित्रपट दाखवला जाणार नाही. पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने यासाठी कारण सुद्धा ईदचे दिले आहे. रमजान ईदच्या काही दिवसांनंतर या चित्रपटाला पाकिस्तानात प्रदर्शनाची परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे. 

 • Weird Reason Pakistan Has Every Time They Ban Indian Movie Release

  काश्मिरच्या नावावर...
  जम्मू आणि काश्मीरच्या नावावर सुद्धा बॉलिवूड चित्रपटावर बंदी लावण्यात आली आहे. अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी यांचा चित्रपट जॉली एलएलबी-2 मध्ये काश्मीरचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावर पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने चित्रपटावर बंदी लावण्याचा निर्णय घेतला. अशाच प्रकारे धर्माच्या नावे पॅडमॅन चित्रपटावर सुद्धा बंदी लावण्यात आली. महिलांच्या अत्यावश्यक अशा पीरियड्सचा विषय आणि त्यांना येणाऱ्या समस्यांना हात घालणाऱ्या या विषयावर पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप होता.

 • Weird Reason Pakistan Has Every Time They Ban Indian Movie Release

  धर्माच्या नावे बॅन...
  पाकिस्तानात प्रेमावर सुद्धा आक्षेप घेण्यात आला. सोनम कपूर आणि धनुष अभिनीत रांझना या चित्रपटावर सुद्धा बंदी लावण्यात आली होती. कारण एवढेच की या चित्रपटात धनुषने कुंदन या हिंदू तरुणाची आणि सोनमने जोया नामक मुस्लिम तरुणीची भूमिका साकारली होती. हिंदू आणि मुस्लिम कॅरेक्टरमध्ये प्रेम संबंध पाकिस्तानला आवडले नाही

 • Weird Reason Pakistan Has Every Time They Ban Indian Movie Release

  प्रतिमेच्या नावे बंदी
  सलमान खान अभिनित आणि कबीर खान निर्मित एक था टायगर आणि टायगर जिंदा है या दोन्ही चित्रपटांमध्ये भारत पाकिस्तानची मैत्री दाखवण्यात आली. यात कतरीना कैफ आयएसआय एजंट आहे, तर सलमान रॉ एजंट आहे. या दोघांचे प्रेम संबंध दाखवताना वेळोवेळी सीन्सच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानात सलोखा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, पाकिस्तानने आपल्या प्रतिष्ठा आणि प्रतिमेची कारणे देत हे दोन्ही चित्रपट आपल्याकडे रिलीज होऊ दिले नाहीत.

Trending