Home | International | Pakistan | 10 Prime Minister in Pak in 46 years

पाकमध्ये ४६ वर्षांत १० पंतप्रधान; पंजाबमधून ६, सिंधमधून ३ व बलुचिस्तानातून 1, खैबर पख्तुनख्वामधून एकही नाही

पाकिस्तानात मागील ४६ वर्षांत राष्ट्रीय राजकारणात सिंध राज्याचा दबदबा सुमारे १२, तर पंजाबचा २० व | Update - Jul 04, 2018, 07:44 AM IST

पाकमध्ये ४६ वर्षांत १० पंतप्रधान; पंजाबमधून ६, सिंधमधून ३ व बलुचिस्तानातून 1, खैबर पख्तुनख्वामधून एकही नाही

 • 10 Prime Minister in Pak in 46 years

  राष्ट्रीय राजकारणात सिंध राज्याचा दबदबा १२, तर पंजाबचा २० वर्षे

  - पाकिस्तानात मागील ४६ वर्षांत राष्ट्रीय राजकारणात सिंध राज्याचा दबदबा सुमारे १२, तर पंजाबचा २० वर्षे राहिला अाहे.
  - सिंध राज्य हा भुत्तो कुटुंबाचा गड अाहे. माजी पंतप्रधान झुल्फिकार अली व बेनझीर भुत्तो हे नेहमी येथूनच निवडणू्क लढवत हाेते.
  - पंजाब राज्य शरीफ कुटुंबाचा गड अाहे. नवाझ हे येथूनच निवडणूक लढवत हाेते. अाता त्यांचे बंधू व मुलगी येथूनच लढत अाहेत.
  - पीपीपीने राजकीय ध्रुवीकरणासाठी २००८मध्ये पंजाबच्या युसूफ रझा गिलानी यांना पक्षाकडून पंतप्रधान बनवले हाेते.

  या वेळी खैबर पख्तुनख्वामधून अालेल्या इम्रान खानमुळे माेठे अाव्हान
  - पीटीअायचे प्रमुख इम्रान खान हे खैबर पख्तुनख्वा भागातील अाहेत. त्यांनी पीएमएल-एन व पीपीपीसमाेर कडवे अाव्हान निर्माण केले अाहे.
  - पीटीअायने २०१३मध्ये खैबर पख्तुनख्वा राज्यात प्रथमच सरकार स्थापन केले हाेते. नॅशनल असेंब्लीत ३५ जागा जिंकल्या हाेत्या.
  - गत १६ वर्षांत तीन पक्षांचे ७ पंतप्रधान झाले. त्यापैकी ६ जण पंजाबमधील हाेते. त्यांनी सुमारे १४ वर्षे सत्ता भाेगली.
  - बलुचिस्तानमधील पीएमएल-क्यूचे नेते जफरुल्ला जिलानी हे दाेन वर्षे पाकचे पंतप्रधान हाेते.

Trending