पाकिस्तानच्या क्वेटामध्ये आत्मघातकी / पाकिस्तानच्या क्वेटामध्ये आत्मघातकी स्फोटात 31 ठार, 30 गंभीर, ISIS ने घेतली जबाबदारी

पाकिस्तानच्या क्वेटामध्ये आत्मघातकी स्फोटात 25 ठार, 30 गंभीर, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता .

दिव्य मराठी वेब टीम

Jul 25,2018 05:46:00 PM IST

क्वेटा - पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथे झालेल्या आत्मघातकी स्फोटात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात 30 हून अधिक लोक जखमी असून त्यापैकी अनेक गंभीर असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ISIS या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


क्वेटा येथील एका मतदान केंद्राच्या बाहेर हा स्फोट घडवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्मघातकी हल्लेखोराला मतदान केंद्रामध्ये प्रवेश करायचा होता. पण त्याला पोलिसांनी केंद्राबाहेर अडवले तेव्हाच त्याने स्फोट घडवला. पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्नभूमीवर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण देशालाच छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

X
COMMENT