Home | International | Pakistan | Court notice to Nawaz Sharif on statement about Mumbai attacks

मुंबई हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरून नवाझ शरीफ यांना न्यायालयाची नोटीस

वृत्तसंस्था | Update - Jun 27, 2018, 09:07 AM IST

पाकिस्तानचे बडतर्फ पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुंबई हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दाखल क

  • Court notice to Nawaz Sharif on statement about Mumbai attacks

    लाहोर- पाकिस्तानचे बडतर्फ पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मुंबई हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शरीफ यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी पाकिस्तानशी संबंधित होते, अशी कबुली शरीफ यांनी दिली होती.


    अॅड. अझहर सिद्दिकी यांनी लाहोर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, शरीफ यांनी मे महिन्यात "डॉन'ला दिलेल्या मुलाखतीत मुंबई हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे सांगितले होते. शरीफ यांचे वक्तव्य देशविरोधी असून याचा उपयोग पाकिस्तानचे शत्रू करू शकतात. शरीफ यांच्या दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आली होती. यानंतर तत्कालीन पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांनी लष्करी नेतृत्वाची वक्तव्याबाबत नापसंती असल्याची माहिती शरीफ यांना देण्यात आली होती. अब्बासी यांची ही कृतीही त्यांनी घेतलेल्या शपथेचे उल्लंघन आहे. यावर न्यायमूर्ती सईद मझहर अली अकबर नक्वी यांनी अब्बासी व डॉनचे पत्रकार सिरिल अल्मेडा यांना नोटीस पाठवली आहे.


    देशविरोधी तत्त्वांवर शरीफांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित
    शरीफ यांनी मुलाखतीत पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना सक्रिय असल्याची कबुली दिली होती आणि देशविरोधी तत्त्वांना सीमापार जाऊन मुंबईत लाेकांची हत्या करण्याच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आपल्याच लोकांनी आपणास विभक्त केले. आपले म्हणणे ग्राह्य धरले नाही, अफगाणिस्तानचे मात्र ते ग्राह्य धरण्यात आले. आपणाला यात लक्ष घालायला पाहिजे,असे शरीफ म्हणाले.

Trending