Home | International | Pakistan | Imran Khan becomes PM after 22 years

इम्रान खानने पदार्पणानंतर २१ वर्षांनी जिंकला होता वर्ल्डकप, आता २२ वर्षांनी पंतप्रधानपदी

वृत्तसंस्था | Update - Jul 27, 2018, 08:57 AM IST

क्रिकेटपटू ते राजकीय नेता असा प्रवास केलेले इम्रान खान पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान असतील.

 • Imran Khan becomes PM after 22 years

  इस्लामाबाद- क्रिकेटपटू ते राजकीय नेता असा प्रवास केलेले इम्रान खान पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान असतील. त्यांचा पीटीआय हा पक्ष पाक निवडणुकीत १२० जागांवर पुढे आहे. अंतिम निकाल यायचा आहे. दुसरीकडे पीएमएल-एन, पीपीपी या पक्षांनी निवडणूक आयोग आणि लष्करावर हेराफेरीचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, लष्कराने इम्रानला जिंकवण्यासाठी निवडणुकीत घोटाळा केला आहे. पीएमएल-एनचे प्रमुख शाहबाज शरीफ यांनी पत्रपरिषद बोलावून निकाल मानण्यास नकार दिला. ते म्हणाले की, 'आम्ही निकाल पूर्णपणे फेटाळत आहोत. लष्कराने मतदान संपताच आमच्या पोलिंग एजंटला बूथबाहेर हाकलले.' विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची घोषणा केली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. रिझल्ट ट्रान्समिशन सिस्टिमचा प्रथमच वापर झाल्याने आणि तांत्रिक गडबडीमुळे निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाला.


  इम्रानच्या आयुष्यातील तीन टप्पे : बेनझीर भुत्ताेंशी अफेअरचा उल्लेख

  क्रिकेटर : १९७१ मध्ये सुरुवात, १९९२ मध्ये विश्वविजेता बनले
  अहमद खान नियाजी इम्रानने १९७१ मध्ये क्रिकेट कारकीर्दीस सुरुवात केली होती. आगमनातच क्रिकेट जगताचे ताईत बनले. १९९२ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ विश्वविजेता बनला. त्यांचे वडील इक्रामउल्ला आर्किटेक्ट होते. इम्रान यांच्यावर आई शौकत यांचा क्रिकेटवर प्रभाव पडला. माजिद खान, जावेद बर्की, इम्रान खान मामेभाऊ होते. मामा अहमद रझा खान संघाचे निवडकर्ते होते. इम्रान यांची १९ व्या वर्षी इंग्लंडला जाणाऱ्या संघासाठी निवड झाली होती. पहिल्या सामन्यात इम्रान यांना कामगिरी दाखवू शकले नव्हते. पण दौऱ्यात ऑक्सफर्डमध्ये प्रवेश घेतला. कारकीर्दीची शेवटचे दहा वर्षे ते क्रिकेट संघाचे बॉस राहिले.


  पंजाबमध्ये पीएमएल-एन, सिंधमध्ये पीपीपी, खैबरमध्ये पीटीआय पुढे
  पंबाज विधानसभेच्या २९७ जागांपैकी १२९ जागांवर पीएमएल-एन, तर १२२ जागांवर पीटीआय पुढे होता. सिंधच्या १३० पैकी ७७ वर पीपीपी पुढे होता. खैबर पख्तुनख्वाच्या ९९ पैकी ५४ जागांवर पीटीआयला मताधिक्य होते. बलुचिस्तानच्या ५१ पैकी १५ वर बीएपी पुढे होता.


  नेता: १९९६ मध्ये पक्षाची स्थापना, २०१८ मध्ये जास्त जागा
  १९९६ मध्ये इम्रान यांनी पीटीआयची स्थापना केली. आता २२ वर्षांनंतर त्यांनी आपल्या पक्षाला पाकिस्तानातील सर्वात मोठा पक्ष बनवले आहे. स्वत: सर्वात बलाढ्य नेते बनले आहेत. मी २१ वर्षे मैदानात होतो. शेवटच्या चेंडूपर्यंत पराभव मान्य नाही. १९९७ मध्ये ते ९ जागांवर उभे होते, परंतु एकाही जागेवर ते विजयी झाले नाही. २००२ मध्ये ते एक जागा जिंकले. २००८ मध्ये त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. २०१३ मध्ये पीटीआय दुसरा मोठा पक्ष ठरला. इम्रान यांनी २०१४ मध्ये १२६ दिवसांचे आंदोलन केले होते.


  कराचीच्या २१ पैकी १३, लाहोरच्या १४ पैकी ५ जागांवर पीटीआय पुढे
  पीटीआयने मोठ्या शहरांत चांगली कामगिरी केली. पीटीआय कराचीत नॅशनल असेंब्लीच्या २१ पैकी १३ जागांवर पुढे होता. लाहोरच्या १४ पैकी ५ जागा जिंकल्या. पीएमएल-एनला ९ जागा मिळाल्या. पीटीआयने पेशावरच्या सर्व ५ आणि इस्लामाबादच्या तिन्ही जागा जिंकल्या.


  सेलिब्रिटी : ६५ व्या वर्षी अध्यात्मिक गुरूशी विवाह
  इम्रान यांचे चरित्रलेखक क्रिस्तोफर सॅनफोर्ड यांनी लिहिले की, आॅक्सफर्डमध्ये शिक्षण घेत असताना इम्रान यांचे माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्याशी अफेअर होते. अभिनेत्री झीनत अमानही त्यांच्यासाठी वेड्या होत्या. १९९५ मध्ये इम्रानने ब्रिटिश उद्योगपती गोल्ड स्मिथ यांची मुलगी जेमिमा यांच्याशी विवाह केला. जेमिमा-इम्रान यांना दोन मुले आहेत. पुढे अँकर रेहम खानशी दुसरा व याच वर्षी इम्रान अाध्यात्मिक गुरू बुशर यांच्याशी विवाहबद्ध झाले.


  माजी पीएम शाहिद खकान अब्बासी, बिलावल भुत्तो, शाहबाज पराभूत
  माजी पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी दोन्ही जागांवरून निवडणूक हरले. एका जागी इम्रानने हरवले. शाहबाज शरीफ दोन्ही ठिकाणी पराभूत झाले. ते लाहोरमध्ये पुढे होते. पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो मलकंदहून हरले, पण सिंधच्या लारकाना येथून ते जिंकले.

Trending