Home | International | Pakistan | Imran Khan will take oth for PM's post before August 14

इम्रान खान १४ ऑगस्टपूर्वी पीएम पदाची घेतील सूत्रे; पीटीआयने केले स्पष्ट, छोट्या पक्षांशी चर्चा सुरूच

वृत्तसंस्था | Update - Jul 30, 2018, 08:28 AM IST

इम्रान खान १४ ऑगस्टपूर्वी सत्ता स्थापन करून पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतील.

 • Imran Khan will take oth for PM's post before August 14

  इस्लामाबाद- पाकिस्तानचे बलाढ्य नेते म्हणून उदयाला आलेले इम्रान खान यांना १४ ऑगस्टपूर्वी सत्ता स्थापन करून पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतील. सध्या सत्ता स्थापनेसाठी छोट्या पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे रविवारी पीटीआयने स्पष्ट केले.


  तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला आहे. ६५ वर्षीय इम्रान खान यांच्या पक्षाने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला सर्व गृहपाठ पूर्ण केला आहे. त्यामुळेच १४ ऑगस्टपूर्वी इम्रान यांच्याकडे सूत्रे असतील, असे पक्षाचे नेते नाइनूल हक यांनी सांगितले. पीटीआयला ११६, पीएमएल-एन- ६४, पीपीपी-४३ जागी विजयी झाले आहेत. नॅशनल असेंब्लीच्या एकूण ३४२ जागांपैकी २७२ जागांची थेट लोकांतून निवड केली जाते. परंतु सरकार स्थापनेसाठी पीटीआयला १७२ जागांची गरज आहे.


  चार पक्षांच्या पाठिंब्यावर १२२ संख्याबळ

  पीटीआयला जीडीए, एमक्युएम-पी, पीएमएल-क्यू, आवामी मुस्लिम लीग या पक्षांनी पाठिंबा दिल्यास पक्षाचे नॅशनल असेंब्लीतील संख्याबळ १२२ वर पोहोचेल. नॅशनल असेंब्लीत इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचे समर्थन मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात बलुचिस्तान नॅशनल पार्टी-मेंगाल-३ , आवामी नॅशनल पार्टी व पाकिस्तान तेहरिक-ए-इन्सानियतचे प्रत्येकी एक सदस्य निवडून आले.


  पीएमएल-एन, पीपीपीची संयुक्त बैठक लवकरच
  पीटीआय सत्तेवर आल्यानंतर इम्रान खानच्या भावी सरकारच्या विरोधात रणनीती आखण्याची तयारी पीएमएल-एन व पीपीपीने केल्याची चर्चा प्रसार माध्यमांतून होत आहे. लवकरच दोन्ही पक्षांचा त्याबाबत निर्णय होऊ शकतो. त्यात सरकारच्या विरोधातील भूमिका निश्चित होऊ शकते. त्यासाठी दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक लवकरच हाेऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

Trending