आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराचीत उष्म्याने 3 दिवसांत 65 मृत्यू, पारा सामान्याहून 10 अंशांनी जास्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन्ही छायाचित्रे कराचीतील आहेत. जलवाहिनी फुटल्यानंतर तयार कारंजात भिजण्याचा आनंद घेणारे आबालवृद्ध. दुसऱ्या छायाचित्रात उन्हामुळे हैराण लोक रस्त्याच्या कडेला विश्रांती घेताना. - Divya Marathi
दोन्ही छायाचित्रे कराचीतील आहेत. जलवाहिनी फुटल्यानंतर तयार कारंजात भिजण्याचा आनंद घेणारे आबालवृद्ध. दुसऱ्या छायाचित्रात उन्हामुळे हैराण लोक रस्त्याच्या कडेला विश्रांती घेताना.

कराची- सूर्य आग आेकत असल्याचा अनुभव कराचीतील नागरिक घेत आहेत. गेल्या तीन दिवसांत ६५ जणांना उष्माघातामुळे प्राण गमावावे लागले आहेत. शहरात काही दिवसांपासून तापमान ४० ते ४४ अंश सेल्सियसदरम्यान आहे. वास्तविक मे महिन्यात कराचीत सामान्य तापमान ३५ अंश सेल्सियस असते. मात्र, संपूर्ण आठवडा तापलेलाच राहील, असे भाकीत हवामान विभागाने वर्तवले आहे. त्यात ऐन पवित्र रमजान महिन्यात वीज कपातीमुळे अडचणींत भर पडली आहे. शवागार चालवणारे इधी फाउंडेशनचे फैजल म्हणाले, तीन दिवसांत रस्त्यांवर १४९ मृतदेह आढळले. त्यापैकी ६५ मृत्यू उष्माघातामुळे झाले आहेत. 

 

भारतातील स्थिती..

मध्य व उत्तर भारतात उष्णतेची लाट असून लोकांना मान्सूनपूर्व पाऊस तथा मान्सूनचे वेध लागलेले आहेत. मान्सून २९ मे रोजी केरळमध्ये धडकण्याचा अंदाज आहे. मंगळवारी राजस्थानचे बुंदी शहर ४८ अंश तापमानासह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले.  इजिप्तच्या बाहरियामध्ये पारा ४८ अंश सेल्सियस होते. 

 

२०१५ मध्ये १३०० झाले होते मृत्यू  

- २०१५- १३०० मृत्यू.   
- २०१६- ४५ मृत्यू.  
- २०१७- ०४ मृत्यू.  

 

कराचीत उष्म्यामुळे  का मृत्यू होताहेत?  

- उष्णतेच्या लाटेमुळे वाऱ्याची दिशा बदलते. समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतायुक्त हवेच्या जागी शुष्क हवा वाहू लागते. झाडे-वेलींचे हरित पट्टे नष्ट होतात. त्यातून लोकांमध्ये अस्वस्थता वाढते. अशा स्थितीत व्यक्तीला उष्माघातास सामोरे जावे लागते.  

 

 

 

 

 पुढील स्लाईडवर पहा, देशातील ८ उष्ण ठिकाणे  

 

 

बातम्या आणखी आहेत...