Home | International | Pakistan | 'MML' is not recognized as a political party

हाफिज सईदच्या ‘एमएमएल’ ला राजकीय पक्ष म्हणून मान्यता नाहीच -निवडणूक आयोग

वृत्तसंस्था | Update - Jun 14, 2018, 09:26 AM IST

पाकिस्तानच्या निवडणूक राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असणारा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिझ सईदला पाकिस्तानच

  • 'MML' is not recognized as a political party

    इस्लामाबाद - पाकिस्तानच्या निवडणूक राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा असणारा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिझ सईदला पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा झटका दिला आहे. आयोगाने सईदच्या मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) या संघटनेची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा अर्ज बुधवारी पुन्हा फेटाळून लावला.


    एमएमएलची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी न करण्याच्या निर्णयाचा फेरआढावा घ्यावा, असे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला दिले होते. बुधवारी अब्दुल गफ्फार सुमरो यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाच्या चार सदस्यांच्या पीठाने हाफिझ सईदचा अर्ज फेटाळून लावला. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, एमएमएल ही जमात-उद-दावा या प्रतिबंधित संघटनेचीच शाखा आहे. मात्र, एमएमएलचा नेता सैफुल्लाह खालिदने हाफिझ किंवा जमात-उद-दावाशी संबंध असल्याचे नाकारले.

Trending