आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान : महिलांना जेथे मतदानही करू दिले जात नाही, तेथेच राजकीय पक्षांनी महिलांना दिली उमेदवारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात २५ जुलै रोजी मतदान होत आहे. निवडणुकीतील सहभागाबाबत येथे महिलांची टोकाची स्थिती आहे. हे चित्र पालटण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना ५% तिकिटे महिलांना देणे बंधनकारक केले आहे. मात्र, विविध पक्षांनी महिला संसदेपर्यंत पोहोचूच नयेत, अशा पद्धतीने तिकीट वाटप केले आहे. यासंदर्भात पाकिस्तानहून ग्राउंड रिपोर्ट... 

 
निवडणूक आयोगाने पाकिस्तानच्या संसदेत महिलांचा टक्का वाढवा यासाठी यंदा सर्व राजकीय पक्षांना ५% तिकिटे महिलांना देण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीस विशेष महत्त्व आहे. अशात नवाझ शरीफ यांच्या पीएमएल(एन)ने ३७, इम्रान खान यांच्या पीटीआय व भुत्तो यांच्या पीपीपीने सर्वाधिक ४२ महिलांना उमेदवारी दिली आहे. निवडणूक रिंगणातून बाहेर फेकले जाऊ या भीतीतून अल्लाह-ओ-अकबर यांसारख्या कट्टरपंथी राजकीय पक्षांनाही महिलांना उमेदवारी देणे भाग पडले आहे. त्यामुळेच या वेळी महिला विक्रमी संख्येत जिंकतील हे कोणीही नाकारू शकत नाही. मात्र, त्या निवडणूक जिंकू शकतात काय? हा खरा प्रश्न आहे. पाकिस्तानमध्ये पुरुष उमेदवाराशी तुल्यबळ लढत देऊ शकणाऱ्या मूठभर महिला उमेदवार आहेत. उदा. पीएमएलएनच्या सायरा अफझल तरार, शेजरा मैनसाब व पीटीआयच्या गुलामबीबी भारवाना यांची नावे घेता येतील. मात्र, त्यांचे राजकीय वजन पुरुष नातेवाइकांमुळेच आहे. पीएमएल-एन नेते दनियाल अजील यांची पत्नी मेहनाज अकबर अजीज आहेत.  


या वेळचा ट्रेंड असाही दिसतो तो म्हणजे, ज्या मतदारसंघात अडथळेच अडथळे आहेत अशा ठिकाणी महिलांना उमेदवारी दिलेली आहे. उपेर डीर जागेवर पीटीआयने हमिदा शाहीदना तिकीट दिले. या जागेवर गेल्या वर्षी महिलांना एकही मतदान पडले नव्हते. या जागेवर हमिदा यांना उभे करून पक्ष स्वत:चे यश असल्याचे सांगत आहे. मात्र, वास्तवात हमिदा यांच्यासाठी निवडणूक खडतर आहे. पक्ष कार्यकर्तेच त्यांना विरोध करत आहेत. पक्षाने महिलांना उभे करून पराजय निश्चित केल्याचे त्यांचे म्हणणे अाहे.  


जिओ टीव्हीच्या वरिष्ठ पत्रकार बेनझीर शाह म्हणाल्या, या अंधकारमय पॅटर्नचा एकमेव अपवाद पीटीआयच्या डॉ. यास्मिन राशीद आहेत. त्यांचा २०१३ ते २०१८ पर्यंतचा राजकीय प्रवास जोरदार राहिला. २०१३ मध्ये त्यांनी नवाझ शरीफ यांना त्यांचा गड लाहोरमध्ये पराभूत करण्यासाठी अाव्हान दिले होते. तेथे पीएमएल-एन ३० वर्षांपासून जिंकत आला आहे. ही निवडणूक यास्मिन ४० हजार मतांनी हरल्या होत्या. यानंतर २०१७ च्या पाेटनिवडणुकीत त्या पुन्हा मैदानात उतरल्या. यात त्यांना केवळ १४ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. या वेळी त्यांना जिंकण्याची चांगली संधी आहे. त्या घरोघरी जाऊन लोकांना भेटत आहेत. लोकांची पसंतीही त्यांना मिळत आहे.  


२०१३ मध्ये २७२ जागांपैकी केवळ ९ महिला (३ %) निवडणूक जिंकून संसदेत गेल्या हाेत्या. उर्वरित ६१ महिला अारक्षित काेट्यातून निवडल्या गेल्या हाेत्या. यंदा ४४ % महिला मतदारांची नाेंदणी झाली अाहे; परंतु े मतदान खूपच कमी प्रमाणात हाेेते. बेनझीर भुत्तो या दाेनदा पंतप्रधान बनूनही निवडणुकांत महिलांची भागीदारी नसल्यासारखीच अाहे. कारण रूढीप्रिय समाज महिलांना घराबाहेर पडू देत नाही. पीएमएल (एन)मध्ये बहुतांश ज्येष्ठ नेते जसे- माजी गृहमंत्री चाैधरी निसार अली खान हे मरियमला नेता मानायला तयार नाहीत. या प्रकरणात पीपीपीचा दृष्टिकाेन मात्र उदारमतवादी अाहे. या पक्षात निर्णय घेण्यापासून ते तिकीट देण्यापर्यंत प्रत्येक बाबीत महिलांना सन्मान दिला जाताे. या वेळी पीटीअायकडूनही महिलांना याेग्य ते महत्त्व दिले जात अाहे.


याबाबत ह्यूमन राइट्स वाॅचच्या स्वरूप इजाज सांगतात की, महिला मतदारांच्या तुलनेत १.२ काेटी पुरुष मतदार जास्त अाहेत. २०१३ च्या निवडणुकीत १.१ काेटी पुरुष मतदार जास्त हाेते. हे अंतर वाढतच अाहे. नॅशनल कमिशन स्टेटसनुसार पाच हजार महिलांना दरराेज नवीन कार्ड दिले तरीही हे अंतर कमी हाेण्यास १८ वर्षे लागतील. अशा प्रकारे ४८ % महिला लाेकसंख्या देशातील मूळ प्रवाहाबाहेर अाहेत.


पाकमध्ये पुरुषांच्या तुलनेत १.२ काेटी महिला मतदार कमी
- पाकिस्तानात ९.७ काेटी मतदार अाहेत. त्यात ५.४४ काेटी पुरुष व ४.२४ काेटी महिला मतदारांचा समावेश अाहे. तसेच लिंगबदल केलेले एक लाख मतदार अाहेत. 
- म्हणजे, १.२ काेटी पुरुष मतदार जास्त अाहेत. २०१३च्या निवडणुकीत हा अाकडा १.१ काेटी हाेता. म्हणजे महिला-पुरुष मतदारांतील फरक वाढत अाहे. 
- राेज ५ हजार महिलांना नवीन कार्ड दिले तरी हा फरक नष्ट हाेण्यास १८ वर्षे लागतील. लाहाेर व फैसलाबाद या विकसित शहरांत हा फरक ५ लाखांहून जास्त.


२०१३ मध्ये अाठशे केंद्रांत महिलांची १०% मते पडली हाेती कमी 
-  २००८ मध्ये पंजाबच्या ३१ केंद्रांत एकाही महिलेचे मतदान झाले नव्हते. 
- २०१३ मध्ये अाठशे केंद्रांत महिलांच्या मतदानाची टक्केवारी १० %पेक्षा कमी हाेती. १७ जिल्ह्यांत ही टक्केवारी ५ %हून कमी हाेती. 
- २०१३ मध्ये ३४२ पैकी ७० महिला खासदार बनल्या. त्यातील ६१ जणी अारक्षित काेट्यातून, तर केवळ ९ महिला निवडणूक जिंकल्या हाेत्या. 
- खैबर पख्तुनख्वाहमध्ये २०१५ च्या स्थानिक निवडणुकीत पुरुषांच्या विराेधामुळे ३० मतदान केंद्रांत एकाही महिलेला मतदान करता अाले नाही.

बातम्या आणखी आहेत...