Home | International | Pakistan | Pak Air Force plane crashes; two pilots killed

पाक हवाई दलाचे विमान काेसळले; २ वैमानिकांचा मृत्यू

वृत्तसंस्था | Update - Jun 27, 2018, 09:19 AM IST

पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे एक जेट विमान मंगळवारी पेशावर हवाई तळावर उतरताना काेसळले. या अप

  • Pak Air Force plane crashes; two pilots killed

    इस्लामाबाद- पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणारे एक जेट विमान मंगळवारी पेशावर हवाई तळावर उतरताना काेसळले. या अपघातात २ वैमानिक शहीद झाले. काही तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली असल्याचे 'द नेशन' वृत्तपत्राकडून सांगण्यात अाले.


    पाक हवाई दलाचे 'एफटी-७ पीजी' हे जेट विमान दैनंदिन प्रशिक्षणासाठी माेहिमेवर हाेते. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे विमानाला पेशावर हवाई तळावर उतरत असताना अपघात झाला. प्रारंभी घटनेचे समजू शकले नाही. त्यामुळे हवाई दलाने घटनेमागील कारण शाेधण्यासाठी तपासाची घोषणा केली अाहे. घटनेनंतर बचा खान अांतरराष्ट्रीय विमानतळावर धुराचे लाेट पसरले हाेते. त्यामुळे आपत्कालीन स्थिती घोषित केली गेली. बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांनी विमानाला लागलेल्या आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवून धावपट्टी माेकळी करण्यात यश मिळवले, असे सूत्रांनी सांगितले.


    दरम्यान, पाक हवाई दल गत काही महिन्यांपासून सातत्याने अशा घटनांचा सामना करत अाहे. या महिन्यात सैन्य दलाचे एक हेलिकाॅप्टर बलुचिस्तान राज्यातील क्वेट्टाजवळ काेसळले हाेते. त्यात निमलष्करी दलाचा एक सैनिक ठार झाला हाेता. यासह सशस्त्र दलाचेही एक विमान काेसळून दाेन चालक जखमी झाले हाेते.

Trending