Home | International | Pakistan | Pakistan election campaign news update

पाकला ६ महिन्यांत भारतापेक्षा पुढे नेले नाही तर नाव बदला : शाहबाज

वृत्तसंस्था | Update - Jul 23, 2018, 08:26 AM IST

पहिल्यांदा त्याचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी सरगोधाच्या सभेत भारतावर हल्ला केला.

 • Pakistan election campaign news update

  इस्लामाबाद- पाकिस्तान निवडणुकीच्या मतदानाला फक्त २ दिवस बाकी आहेत. या वेळीही तेथील निवडणूक राजकारण बऱ्याच अंशी भारताला केंद्रस्थानी ठेवून होत आहे. या वेळी काश्मीरपेक्षा मोठा मुद्दा मोदी आणि भारताशी संबंध हा आहे. नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन या पक्षाने भारताचे नाव घेतले नव्हते. पहिल्यांदा त्याचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी सरगोधाच्या सभेत भारतावर हल्ला केला.


  ते म्हणाले की, पाकिस्तान भारतापेक्षा प्रत्येक गोष्टीत चांगला आहे. मी पंतप्रधान झालो तर पाकिस्तानला भारतापेक्षा चांगला करीन. जर मी शत्रू असलेल्या भारतापेक्षा पाकला पुढे नेले नाही तर माझे नाव बदला. मी सहा महिन्यांत देशाला भारताच्या दबावापासून मुक्त करीन. भारतीय वाघा सीमेवर येतील आणि पाकिस्तानला गुरू मानतील. पीपीपी आणि पीटीआयचे नेते सतत मोदी आणि शरीफ यांच्या मैत्रीचे मुद्दे उपस्थित करत आहेत. पीटीआयच्या प्रत्येक सभेत त्याचे समर्थक ‘मोदी का जो यार है, वो गद्दार है’ अशा घोषणा देतात. बलुचिस्तानात भारत सर्वात मोठा निवडणूक मुद्दा आहे. १३ जुलैच्या मस्तुंगच्या स्फोटात भारताचा हात असल्याचे बलुचिस्तान अवामी पार्टी (बीएपी) म्हणत आहे.


  बलुचिस्तानात भारत सर्वात मोठा निवडणूक मुद्दा
  बलुचिस्तानच्या मस्तुंग स्फोटात बीएपी उमेदवार सिराज रायसानीही ठार झाला होता. बीएपी सिराजची जुनी छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत आहे, त्यात तो तिरंगा ध्वजावर उभा दिसत आहे. त्याची भारतविरोधी आणखी काही आक्षेपार्ह पोस्टर्स आहेत. पक्षनेत्यांच्या मते, भारताच्या गुप्तचर संस्थांनी त्याला मारले आहे. आता सिराजचा भाऊ सरफराज सोशल मीडियावर भारतविरोधी मोहीम पुढे नेत आहे. कार्यकर्त्यांसोबत तिरंगी ध्वजाचा अपमान करत आहे. इम्रान खाननेही यावरून भारतावर निशाणा साधला आहे.


  पंजाबमध्ये ६०, बलुचिस्तान प्रांताच्या १६ जागा प्रभावित
  पाकच्या ३ राज्यांत भारत आणि पीएम नरेंद्र मोदींना पक्षांनी मुद्दा बनवले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या वेळी निवडणुकीतील १०० जागा भारत प्रभावित आहेत. त्यात लाहोरच्या १४ जागांसह पंजाबच्या ६० वर जागा आहेत. तेथे विरोधक पीएमएल-एनवर त्याच्या बालेकिल्ल्यात शरीफ-मोदी मैत्रीवरून निशाणा साधत आहेत. सिंधमध्ये राजस्थान सीमेला लागून असलेल्या २० जागांवर भारत हा मुद्दा आहे. बलुचिस्तानच्या सर्व १६ जागांवर भारत मुद्दा आहे. बलुचिस्तान मूव्हमेंट आणि दहशतवादात भारताचा हात असल्याचे स्थानिक पक्ष म्हणत आहेत.


  लष्करी मुख्यालयाबाहेर झाल्या आयएसआय मुर्दाबादच्या घोषणा
  पीएमएल-एनच्या समर्थकांनी रावळपिंडीत लष्करी मुख्यालयाबाहेर आयएसआय मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, निवडणुकीत आयएसआय खेळ करत आहे. निवडणूक फिक्स आहे. याआधी आयएसआयच्या विरोधात अशी घोषणाबाजी झाली नव्हती.


  प्रचारामध्ये १२ दिवसांत चौथा हल्ला, पीटीआयचा उमेदवार ठार
  डेरा इस्माइल खानमध्ये एका आत्मघाती हल्ल्यात पीटीआय उमेदवार इकरामुल्लाह गंदरपूर ठार झाले. हल्ल्यात १० लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनुसार हल्ल्यात सुमारे १० किलो स्फोटके वापरण्यात आली. प्रचार मोहिमेत १२ दिवसांतील हा चौथा हल्ला आहे.


  मरियम तुरुंगात वाचत आहेत फैज अहमद फैज यांचे पुस्तक
  १३ जुलैला अटकेनंतर मरियम शरीफ यांच्या ट्विटर हँडलवरून प्रथमच शनिवारी ट्विट करण्यात आले. त्यात मरियम यांनी उर्दू कवी फैज अहमद फैज यांचा शेर ट्विट केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘गर बाजी इश्क की बाजी है, जो चाहो लगा दो डर कैसा। गर जीत गए तो क्या कहना, हारे भी बाजी मात नहीं।’


  २०१३ मध्ये नवाझ यांच्या पीएमएल-एनला पंजाबमध्ये ४९% मते व ७८% जागा मिळाल्या
  गेल्या दोन निवडणुकांत पंजाबमध्ये नवाझ यांच्या पीएमएल-एन पक्षाची पंजाबमध्ये मते व जागा दोन्ही वाढले आहेत. २०१३ च्या नॅशनल असेंब्ली निवडणुकीत नवाझ यांना पंजाबच्या १४८ पैकी (सध्या १४१) ११६ जागा मिळाल्या होत्या. म्हणजे पीएमएल-एनने ७८% जागा जिंकल्या होत्या. पीएमएलएनला पंजाबमध्ये ४९% मते तर पीटीआयला १९% मते मिळाली होती. दुसरे महत्त्वाचे राज्य सिंध आहे. गेल्या निवडणुकीत पीपीपीने येथे ३२ जागा जिंकल्या होत्या. पक्षाला ३८% मते मिळाली होती. मात्र, या वेळी पीटीआयमुळे तुल्यबळ लढत होत आहे.

 • Pakistan election campaign news update
 • Pakistan election campaign news update

Trending