आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाहोर- पाकिस्तानच्या राजकारणाचे पंजाब प्रांत पॉवर हाऊस म्हणून आेळखला जातो. जागावाटपाचा विषय असो की मतदारांची संख्या किंवा दिग्गज नेता, प्रत्येक पातळीवर पंजाब अव्वल स्थानी आहे. पंजाब प्रांत जिंकणाऱ्या राजकीय पक्षाला देशात सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होतो, असे मानले जाते. त्यामुळे पाकिस्तानात यंदाही राजकीय पक्षांच्या प्रचार मोहिमेचे केंद्र पंजाब प्रांत हेच आहे. सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते पंजाबमधून भाग्य आजमावू लागले आहेत. यंदा पाकिस्तानात २७२ जागांसाठी एकूण ३ हजार ४५९ उमेदवार मैदानात आहेत. त्यात १ हजार ६२३ अर्थात ४६.९२ टक्के एकट्या पंजाब प्रांतातून निवडणूक लढवणार आहेत. नॅशनल असेंब्लीच्या २७२ पैकी १४१ जागा पंजाब प्रांतातील आहेत. पाकिस्तानात १०.५९ कोटी मतदार आहेत. त्यापैकी ६.६७ कोटी अर्थात ६३ टक्के एकट्या पंजाबमध्ये आहेत.
१९७२ मध्ये पाकिस्तानचे विभाजन झाल्यानंतर आतापर्यंत १० पंतप्रधान झाले . त्यापैकी ६ पंजाब प्रांतातून निवडून आले. ३ पंतप्रधान सिंध प्रांतातून व एक बलुचिस्तानमधील होते. खैबर पख्तुनख्वामधून आतापर्यंत एकही पंतप्रधान झालेला नाही. पाकिस्तानात एकूण ४ प्रांत आहेत.
इम्रान ५, शाहबाज ४, बिलावल ३ मतदारसंघांमधून लढणार
पीएमएल-एनचे : मरियम पंजाबमध्ये
पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ ४ मतदारसंघांतून निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी एन-१३२, एन- १९२ डेरा गाझी खान, एनए-२४९ कराची व एन-३ स्वातचा समावेश आहे. नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम लाहोरच्या एनए-१२७ मधून लढत आहे. माजी पंतप्रधान शाहिद खकान पंजाबच्या एनए -५७ मुरी व इस्लामाबादममधून लढत आहेत.
पीटीआय : इम्रानच्या दोन जागा पंजाबमध्ये
इम्रान खान पाच जागांवरून निवडणूक लढवणार आहेत. त्यात खैबरची एन-३५ बानू, पंजाबची एनए-५३, इस्लामाबाद, एनए-९५ मियानवाली, एनए-१३१, लाहोर व सिंधच्या एनए-२४३ कराची मधून नशीब आजमावणार आहेत.
पीपीपी: गड सिंध, पण जास्त जागांची अपेक्षा
पीपीपी चेअरमन बिलावल भुत्तो तीन प्रांतांतील तीन जागांवर लढत आहेत. त्यात खैबर पख्तुनख्वा, मालाकंद, लाहोर व सिंधच्या लयारी मधून लढवत आहेत. त्यांचे वडील झरदारी सिंध व गिलानी पंजाबमधून लढत आहेत.
पाच वर्षांत ३० टक्के गैरमुस्लिम मतदारांत वाढ
पाकिस्तानात गेल्या पाच वर्षांत गैरमुस्लिम मतदारांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गैर मुस्लिम मतदार ३६.३ लाख आहेत. त्यात १७.७ लाख हिंदू, ख्रिश्चन-१.४० लाख आहेत. शीख मतदार केवळ ८ हजार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.