Home | International | Pakistan | Pakistan Prevents U.S. Diplomat From Leaving The Country

अमेरिकन राजनियकाला देश सोडण्यास पाकिस्तानचा विरोध, नशेत गाडी चालवून युवकाला चिरडले होते

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2018, 02:07 PM IST

अमेरिकेने आपल्या राजनिय अधिकाऱ्यावर कोणतीच कारवाई होणार नाही याची पाकला दक्षता घेण्यास सांगितले होते.

 • Pakistan Prevents U.S. Diplomat From Leaving The Country
  अमेरिकन राजनयिक अधिकाऱ्याला देश सोडून जाण्यापासून पाकने रोखले आहे.

  इस्लामाबाद - पाकिस्तानने शनिवारी रस्ते अपघातातील आरोपी अमेरिकेचे राजनयिक कर्नल जोसेफ इम्यॅनुएल हॉल यांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. अमेरिकेने आपल्या राजनियक अधिकाऱ्यासाठी विमान पाठवले होते, मात्र पाकिस्तान प्रशासनाने त्यांना जाण्याची परवानगी दिली नाही. सुरक्षा यंत्रणांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. हॉल यांच्यावर आरोप आहे की 7 एप्रिल रोजी त्यांनी सिग्नल तोडून एका बाइकला धडक दिली होती. त्यात एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

  नशेत गाडी चालवण्याचा आरोप
  - पाक मीडियातील वृत्तानुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की हॉल एक पांढऱ्या रंगाची कार चालवत आहेत. त्यांनी सिग्नल तोडून एका बाइकला धडक दिली. यात तीन युवक जखमी झाले होते. त्यातील एकाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला.
  - हॉल यांच्याविरोधात कोहसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांना अटक केली नव्हती.

  इस्लामाबाद हायकोर्टात पोहोचले प्रकरण
  - मृत तरुणाच्या वडिलांनी कर्नल हॉल विरोधात इस्लामाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान, जस्टिसल आमेर फारुख म्हणाले, की कर्नल हॉल यांच्याकडे असे कोणतेही अधिकार नाहीत ज्यामुळे ते कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकतात.
  - त्यासोबतच कोर्टाने गृहमंत्रालयाला सांगितले की दोन आठवड्यात एग्झिट कंट्रोल लिस्ट (देशातून बाहेर जाणाऱ्या लोकांवर नजर ठेवणारी यादी) मध्ये हॉल यांचे नाव समाविष्ट करावे यावर विचार करावा.

  कर्नल हॉलचे नाव ब्लॅक लिस्टमध्ये
  - अमेरिकेने आपल्या राजनिय अधिकाऱ्यावर कोणतीच कारवाई होणार नाही याची पाकला दक्षता घेण्यास सांगितले होते. मात्र पाक गृहमंत्रालयाने 24 एप्रिल रोजी कोर्टाला सांगितले की हॉलचे नाव ब्लॅक लिस्टमध्ये घेण्यात आले आहे.

 • Pakistan Prevents U.S. Diplomat From Leaving The Country
  मृत मुलाच्या पित्याने इस्लामाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

Trending