Home | International | Pakistan | Pakistan Says Jinnah Portrait Row Shows Growing Intolerance in India

जिन्ना तस्वीर वाद: भारतात मुस्लिम-पाक बद्दल असहिष्णूता आणि पूर्वग्रह वाढला - पाकिस्तान

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 11, 2018, 10:47 AM IST

पाकिस्तानने म्हटले आहे की अलीगड मुस्लिम विद्यापीठातील (एएमयू) मोहम्मद अली जीन्ना यांच्या तस्वीरीवरुन सुरु असलेला वाद.

 • Pakistan Says Jinnah Portrait Row Shows Growing Intolerance in India
  अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेच्या कार्यालयात जिन्नांचा फोटो लावलेला आहे.

  इस्लामाबाद - पाकिस्तानने म्हटले आहे की अलीगड मुस्लिम विद्यापीठातील (एएमयू) मोहम्मद अली जीन्ना यांच्या तस्वीरीवरुन सुरु असलेला वाद दाखवतो की भारतात मुस्लिम आणि पाकिस्तानबद्दल किती असहिष्णू आणि पूर्वग्रहदुषित वातावरण आहे. एएमयूमधील जिन्ना यांचा फोटो काढावा यासाठी हिंदू संघटना आणि उजव्या विजारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी आग्रह धरला आहे. त्यावरुन वादही झाला होता.

  जिन्ना यांची तस्वीर 1938 पासून
  - पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी म्हटले आहे, की एएमयूच्या आजीव सदस्यांचे फोटो विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात लावण्याची परंपरा आहे. तिथे जिन्ना यांची तस्वीर 1938 सालापासून आहे.
  - जिन्नांचा फोटो काढावा ही मागणी एका खासदाराने केली होती. यावरुन भारतात मुस्लिमांबद्दल किती असहिष्णू आणि पूर्वग्रह दुषित वातावरण आहे हे दिसून येते. हे भारतीयांसाठीच अधिक धोकादायक आहे.
  - या संपूर्ण प्रकरणावरुन दिसून येते की भारतीय समाजात धार्मिक कट्टरता किती वाढत आहे. जे सत्तेत आहे, तेच त्याला अधिक खतपाणी घालत आहेत.
  - दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये याच्या उलट स्थिती आहे. इस्लामाबाद वस्तूसंग्रहालयात आजही गांधींचा फोटो आहे.

 • Pakistan Says Jinnah Portrait Row Shows Growing Intolerance in India
  जिन्नांच्या फोटोवरुन पाकिस्तानने भारतात असहिष्णुता वाढली असल्याचे म्हटले आहे.

Trending