Home | International | Pakistan | Pakistan Sindh Province Assembly Passes Bill To Allow Hindu Widows To Remarry

PAK : हिंदू महिलांना मिळाला दुसरे लग्न करण्याचा अधिकार, सिंध प्रांताने मंजूर केले विधेयक

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 28, 2018, 01:40 PM IST

पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू समाजात महिलांना अनेक जाचक अटी आणि रुढींच्या बंधनात राहावे लागत होते. दुसरे लग्न करण्याचा

 • Pakistan Sindh Province Assembly Passes Bill To Allow Hindu Widows To Remarry
  पाकिस्तानमधील हिंदू विधवा आणि घटस्फोटीत महिलांना आता दुसरे लग्न करण्याचा अधिकार मिळाला आहे.

  कराची - पाकिस्तानमधील हिंदू महिलांसाठी येथील सिंध प्रांतच्या विधानसभेने महत्त्वाच्या कायद्याला मंजूरी दिली आहे. पाकस्तानातील हिंदू विधवा महिलांना दुसरे लग्न करण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे. हिंदू महिला पतीच्या मृत्यूनंतर 6 महिन्यांनी दुसरे लग्न करु शकणार आहेत. त्यासोबतच हिंदू महिला या लग्न मोडण्यासाठी अर्जही करु शकणार आहेत. याआधी अल्पसंख्याक महिला, विधवा आणि घटस्फोटीतांना दुसरे लग्न करण्याचा अधिकार नव्हता. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी सिंध प्रांतच्या विधानसभेने हिंदू विवाह कायदा (2016) मंजूर केला होता. त्यानुसार सिंध प्रांतात राहाणाऱ्या 30 लाखांपेक्षा जास्त हिंदू समाजाच्या नागरिकांना विवाह नोंदणी आणि त्यासंबंधीचे अधिकार देण्यात आले आहेत.

  हिंदू महिला करु शकतील आता दुसरे लग्न
  - पाकिस्तानमधील हिंदू महिला आजही रुढीवाद आणि जुन्या परंपराच्या बळी ठरत होत्या. मुस्लिम लीगचे नंद कुमार गोकलानी यांनी विधानसभेत हिंदू महिलांच्या दुसऱ्या लग्नाचे विधेयक सादर केले होते. ते म्हणाले, 'हिंदू समाजात विशेषतः विधवा महिलांना दुसऱ्या विवाहाची परवानगी दिली जात नव्हती. या कायद्यामुळे आता विधवा महिलांना दुसरे लग्न करण्याचा अधिकार मिळणार आहे.'
  - सिंध प्रांताचे कायदेमंत्री म्हणाले, हे विधेयक सर्व संमतीने मंजूर करण्यात आले आहे.
  - पाकिस्तानमधील हिंदू लोकसंख्येच्या निम्मे हिंदू हे सिंध प्रांतात राहातात. यात हैदराबाद, सुक्कर आणि कराचीचा काही भाग आहे.

  पहिल्या पतीला घटस्फोट दिल्याशिवाय दुसरे लग्न नाही
  - संशोधित विधेयकानुसार बहुविवाहावर बंदी घालण्यात आली आहे. यानुसार पती-पत्नी वेगवेगळे राहात असतील आणि त्यांच्यात घटस्फोट झालेला नसेल तर पती किंवा पत्नी दुसरे लग्न करु शकणार नाही.
  - या कायद्यानुसार, एखाद्याने आपल्या पार्टनरला धोक्यात ठेवून दुसरे लग्न केले तर त्याला किंवा तिला 6 महिने कैद आणि 5 हजार रुपये दंड किंवा हे दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.
  - या कायद्यानुसार मुलगा आणि मुलीचे विवाह योग्य वय 18 वर्षे असले पाहिजे. सिंध प्रांतात अल्पसंख्याक समाजात 18 वर्षांच्या आतील मुला-मुलींचे लग्न लावून देण्याचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. त्यावर आता कायद्याने बंदी घालण्यात आली आहे.

 • Pakistan Sindh Province Assembly Passes Bill To Allow Hindu Widows To Remarry
  नवाज शरीफ सरकारने 2017 मध्ये हिंदू मॅरेज बील मंजूर केले होते. (फाइल)

Trending