आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा अमेरिकेसह 39 देशांनी हुकुमशहा सद्दाम हुसेनच्या इराकविरूद्ध छेडले युद्ध!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
4 नोव्हेंबर 1990- इराकला उत्तर देण्यासाठी सौदीतील वाळवंटात तैनात केलेले अमेरिकेचे फर्स्ट कॅव्हेलरी डिवीजनचे जवान.... - Divya Marathi
4 नोव्हेंबर 1990- इराकला उत्तर देण्यासाठी सौदीतील वाळवंटात तैनात केलेले अमेरिकेचे फर्स्ट कॅव्हेलरी डिवीजनचे जवान....

इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेने इराकविरूद्धची लढाई 16 जानेवारी 1991 रोजी सुरु केली होती त्याला नाव देण्यात आले होते ऑपरेशन डेजर्ट स्टॉर्म. ऑगस्ट 1990 मध्ये जेव्हा इराकने कुवेतवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेने 38 देशांना एकत्र करत इराकविरूद्ध युद्ध छेडले होते. 1990 ते 1991 या दरम्यान इराक आणि अमेरिकेच्या मित्रदेशांत लढलेल्या या युद्धाला नंतर गल्फ वॉर नावाने ओळखले जाऊ लागले. इराकने कुवेतविरूद्ध का छेडले होते युद्ध?...

 

- 1980 पासून इराण आणि इराक यांच्यात सुरु असलेल्या आठ वर्षांच्या युद्धात लक्ष घालण्याची किंमत कुवेतला या युद्धाच्या रूपाने चुकवावी लागली. 
- इराणसोबतच्या युद्धात कुवेतने इराकला खूपच फंडिंग केले होते. 
- युद्ध संपताच इराक कर्जात बुडाला होता आणि त्याने कुवेतला कर्ज माफ करण्यास सांगितले. 
- कर्ज माफीवरून कुवेतसोबत यशस्वी वाटाघाटी न झाल्याने अखेर इराकने त्यांच्यावर हल्ला केला होता.

 

गल्फ वॉरचा घटनाक्रम...

 

2 ऑगस्ट 1990- इराकने कुवेतवर हल्ला केला. त्यावेळी इराकची सत्ता सद्दाम हुसेनच्या हातात होती. 
2 ऑगस्ट 1990- यूनायटेड नेशनने रिजोल्यूशन पास करून कुवेतवर इराकच्या हल्लाबाबत निषेध केला. 
6 ऑगस्ट 1990- यूएनने इराकवर अनेक प्रतिबंध घातले. 
7 ऑगस्ट 1990- अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुशने ऑपरेशन डेसर्ज शील्ड शुरू करण्याचा आदेश दिला. 
8 ऑगस्ट 1990- इराकने कुवैतवर ताबा घेतला आणि तो आपला प्रदेश असल्याचे जाहीर केले.
29 नोव्हेंबर 1990- यूएनने 15 जानेवारी 1991 नंतर लष्करी कारवाई करण्यास मंजूरी दिली.
16-17 जानेवारी 1991- अमेरिका आणि मित्रदेशांनी मिळून ऑपरेशन डेजर्ट स्टॉर्म सुरू केले. 
24 फेब्रुवारी 1991- इराकविरूद्ध जमिनीवरून हल्ले सुरु केले. 
27 फेब्रुवारी 1991- बगदाद रेडियोने घोषणा केली की, इराक यूएनचे रिजोल्यूशन मान्य करेल.

 

स्वतंत्र झाला कुवेत-

 

27 फेब्रुवारी 1991- कुवेतला इराकच्या ताब्यातून सोडवले गेले. 
28 फेब्रुवारी 1991- इराकच्या विरूद्ध अमेरिका व मित्रदेशांनी हल्ले थांबवले. 
14 मार्च 1991- कुवेतमध्ये पुन्हा त्यांचे राज्य सुरु झाले. 
6 एप्रिल 1991- इराक सीजफायर एग्रीमेंटची अटी मान्य केल्या.

 

गल्फ वॉरशी संबंधित काही फॅक्ट्स-

 

- इराकविरूद्ध अमेरिका आणि 38 देशांनी मिळून एक गट बनवला होता. 
- या गटात 28 देशांच्या लष्कराचे सुमारे 670,000 सैनिक सहभागी झाले होते. यात एकट्या अमेरिकेचे 425,000 सैनिक होते.
- यूएसच्या डिफेन्स डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, गल्फ वॉरमध्ये 4130 अब्ज रुपये (61 बिलियन डॉलर) खर्च झाले होते. 
- कुवेत, सौदी अरब आणि इतर गल्फ देशांत 2435 अब्ज रुपयेचा (36 बिलियन डॉलर) खर्च आला होता. 
- जर्मनी आणि जपानवर 1082 अब्ज रुपये (16 बिलियन डॉलर) चा खर्च आला. 
- सीएनएन रिपोर्ट नुसार, या युद्धात 1 लाखांहून अधिक इराकी सैनिक मारले गेले होते. 
- अमेरिकेच्या 383 सैनिकांचा मृत्यू झाला होता.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गल्फ वॉर दरम्यानचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...