Home | International | Pakistan | Sharif has 32 thousand crores of rupees in India

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भारतात 32 हजार कोटी रुपये

वृत्तसंस्था | Update - May 09, 2018, 05:16 AM IST

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतात अब्जावधी रुपयांचा काळा पैसा जमा केल्याचा आरोप होत आहे. जिओ न्यूजनुसार नॅशनल

  • Sharif has 32 thousand crores of rupees in India

    इस्लामाबाद - पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारतात अब्जावधी रुपयांचा काळा पैसा जमा केल्याचा आरोप होत आहे. जिओ न्यूजनुसार नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने स्थानिक माध्यमातील बातमीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. वृत्तानुसार शरीफ व इतरांनी भारतात कथितरीत्या सुमारे ३२ हजार कोटी रुपये अवैधरीत्या दडवले आहेत.

    ही रक्कम चक्क भारताच्या अर्थ मंत्रालयात जमा करण्यात आली आहे. यामुळे भारताची परकीय चलन गंगाजळी प्रचंड प्रमाणात वाढली. तसेच पाकिस्तानला यामुळे प्रचंड नुकसान सोसावे लागले, असाही दावा बातमीत आहे.

Trending