आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक निवडणूक : हाफिजचा मुलगा, जावयासह २६५ उमेदवारांना दिले तिकीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या हाफिज सईदचा मुलगा, जावयासह २६५ उमेदवार पाकिस्तानातील आगामी सार्वत्रिक व प्रांतिक निवडणुकीत उतरणार आहेत. सईदच्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेच्या वतीने सत्ता मिळवण्याची खेळी सुरू झाली आहे.


२६५ पैकी ८० उमेदवार संसदीय निवडणुकीसाठी उतरवण्यात आले आहेत, तर १८५ प्रांतिक सभेसाठी उतरवण्यात आले आहेत. त्यात सईदचा मुलगा हाफिज ताल्हा सईद व जावई खालिद वालिद यांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारले. ताल्हा हा एनए-९१ सारगोधा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. खालिद वालिद एनए-१३३ लाहोरमधून निवडणुकीत उतरला आहे. सारगोधा हे सईदचे मूळ गाव आहे. २५ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. सईदवर अमेरिकेने एक कोटी डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. सईद निवडणूक लढवणार नाही. सईदने मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) ही राजकीय आघाडी सुरू करून नवा कट रचला. निवडणूक आयोगाने एमएमएलला नोंदणीसाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे सईदने अल्लाहू अकबर तेहरिक या नोंदणीकृत पक्षाच्या मदतीने आपले २६५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान, दहशतवादविरोधी मोहिम तीव्र केल्याचा दावा सरकार करते. 


महत्त्वाच्या ठिकाणी एमएमएलचे उमेदवार 
एमएमएलच्या पाठिंब्यावरील उमेदवार कराची, सिंध, खैबर-पख्तुनख्वा व देशाच्या इतर भागांतून निवडणूक लढवणार आहेत. २५ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत पोकळी निर्माण होऊ देणार नाही. आम्हाला सत्ता नको. परंतु भ्रष्टाचाराचे उच्चाटन करणे, पाकिस्तानच्या विचारसरणीला बळकटी देणे या उद्देशाने निवडणूक लढवणार आहोत, असा दावा एमएमएलचे अध्यक्ष सैफुल्ला खालिद यांनी केला. 


अमेरिकेच्या दहशतवाद्यांच्या यादीत नाव समाविष्ट असलेल्या कारी मोहंमद शेख याकूब याला जेयूडीने तिकीट दिले आहे. तो एनए-१२५ लाहोर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. यापूर्वी एनए-१२० लाहोर मतदारसंघातूनही त्याने निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून नवाझ शरीफ यांच्या पत्नी कुलसुम शरीफ यांचा विजय झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...