आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद- पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदाच्या हज यात्रेत सेवेकरी म्हणून ट्रान्सजेंडर्सला पाठवण्यात येणार आहे. स्वयंसेवकांच्या टीममध्ये या ट्रान्सजेंडर्सला समाविष्ट करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.
ट्रान्सजेंडर्स तरुणांना सौदी अरेबियात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यावर अंतिम निर्णय लवकरच होणार आहे, अशी माहिती सिंध बॉइज स्काऊटचे आयुक्त अतिफ अमीन हुसेन यांनी दिली. ब्लू व्हेन्स ही ट्रान्सजेंडर समुदायाच्या हक्कासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने ट्रान्सजेंडर्सला यंदाच्या हज यात्रेत सहभागी करून घेण्यासाठी जोर लावला होता. त्याचबरोबर या प्रकरणात समन्वयाचेही काम केले. २०१८ च्या हज यात्रेत दोन किंवा तीन ट्रान्सजेंडर सहभागी होऊ शकतील.
प्रशिक्षण, चाचणीनंतर निवड
हज यात्रेसाठी सौदीला पाठवण्यासाठी पाकिस्तान सरकार इच्छुकांची चाचणी घेतो. त्यानंतर त्यात निवडलेल्या योग्य प्रशिक्षण दिले जाते. यातून िनवडलेल्यांची यादी केंद्र सरकारकडे पाठवली जाते. सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर स्वयंसेवकांचा यात्रेला पाठवण्यात येणाऱ्या टीममध्ये समावेश केला जातो.
सर्वात मोठी स्वयंसेवक संस्था
अलीकडेच सिंध प्रांतातील ४० ट्रान्सजेंडर्सनी पाकिस्तान बॉय स्काऊट्स असोसिएशनमध्ये सहभाग नोंदवला तसेच सेवाकार्याची शपथ घेतली. ही संस्था देशातील सर्वात मोठी स्वयंसेवकांची संस्था आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.