Home | International | Pakistan | Voting in Pakistan today, 3 candidates of PM post

पाकिस्तानात आज मतदान, हिंसाचाराच्या भीतीमुळे देशाचे रूपांतर लष्करी छावणीत, हजारो कफनचीही ऑर्डर !

मेहमल सर्फराज, वरिष्ठ पत्रकार, नियो चॅ | Update - Jul 25, 2018, 10:02 AM IST

पाकिस्तानच्या सात दशकांच्या इतिहासात लोकशाही पद्धतीने सत्तेची हस्तांतरण प्रक्रिया राबवली जाण्याची ही दुसरी वेळ आहे.

 • Voting in Pakistan today, 3 candidates of PM post

  लाहाेर - पाकिस्तानात बुधवारी नवीन सरकारसाठी मतदान होणार आहे. पाकिस्तानच्या सात दशकांच्या इतिहासात लोकशाही पद्धतीने सत्तेची हस्तांतरण प्रक्रिया राबवली जाण्याची ही दुसरी वेळ आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ले, हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लाहोर, कराची, इस्लामाबाद, फैसलाबाद यासारख्या शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढली आहे. चारही राज्यांच्या राजधानीत २५ पोलिस अधीक्षक, ५० पोलिस उपअधीक्षक, २०० पेक्षा जास्त निरीक्षकांसह ३५ हजार पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सैन्य खडा पहारा देत आहेत. एवढेच नव्हे तर हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन पेशावरचे उपायुक्त इम्रान हमीद शेख यांनी १ हजार कफनची ऑर्डरही दिली आहे.


  नॅशनल असेंब्लीच्या ३४२ जागा, २७२ जागांवर मतदान, ७० राखीव
  मतदान :
  पाकिस्तानात नॅशनल असेंब्लीच्या एकूण ३४२ जागांसाठी ही मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. २७२ जागा थेट मतदान प्रक्रियेद्वारे निवडल्या जातील. ६० जागांवर महिला व १० जागा अल्पसंख्याक वर्गासाठी राखीव आहेत. १७१ जादुई आकडा आहे.
  मतदार : सार्वत्रिक निवडणुकीत १० कोटी ५९ लाख ५५ हजार ४०७ मतदार आपला हक्क बजावतील. मतदानासाठी ८५ हजारांहून अधिक मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. २०१३ च्या निवडणुकीत ५५ टक्के मतदारांनी हक्क बजावला होता.
  उमेदवार : १२ हजार ५७० उमेदवार संसद तसेच प्रांतीय विधानसभेच्या रिंगणात भाग्य आजमावत आहेत. नॅशनल असेंब्लीसाठी ३ हजार ६७५ व प्रांतीय विधानसभेसाठी ८ हजार ८९५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.


  इम्रानने नवाझ यांना संबोधले गाढव, समर्थकांनी गाढवाला केले ठार
  पाकिस्तानच्या निवडणुकीदरम्यान तेहरिक-ए-इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खानने गेल्या आठवड्यात शरीफ व त्यांच्या पक्षाला गाढव असे संबोधले होते. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एक गाढव आणून त्यावर नवाझ लिहिले व त्याला काळे लावले. गाढवा बेदम मारहाणही केली. त्याला एका गाडीला बांधून आेढत नेेले. प्राणी संरक्षण संस्थेने त्या गाढवावर उपचार केले. मात्र उपचारादरम्यान एक दिवस गाढवाचा मृत्यू झाला.


  टीव्ही जाहिरातीत नवाझच्या पक्षाने खर्च केले ५० कोटी
  पाकिस्तानात यंदा निवडणुकीच्या जाहिराती टीव्हीवरून झळकल्या. या जाहिराती पक्ष किंवा त्यांच्या उमेदवारांनी दिल्या. प्राईम टाइममध्ये एक मिनिटांचा स्लॉट सुमारे ४ लाख रुपयांत विकल्या गेल्या. जाहिरात संस्थांच्या सूत्रानुसार १० जुलै ते २३ जुलै दरम्यान नवाझ यांच्या पिपल्स मुस्लिम लिग (नवाझ) या पक्षाने ५० कोटी, इम्रानच्या पीटीआयने ४५ कोटी व बिलावल भुत्तोंच्या पीपीपीने सुमारे ३५ कोटी रुपये त्यावर खर्च केले.


  सर्वात हायटेक निवडणूक
  मतदान केंद्राची निगराणी ठेवण्यासाठी जवानांना ४ जी सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याने निगराणी ठेवली जाणार आहे. ड्रोन व हेलिकॉप्टरच्या मदतीने देखील निगराणी केली जाणार आहे. त्यासाठी पोलिस व जवानांना ४ जी-एलटीई आधारित स्मार्टफोन देण्यात आले आहेत. त्यामुळे रिअल टाईम सर्व मतदान केंद्रावरील स्थिती पाहायला मिळणार आहे.

  पाकिस्तान निवडणुकीत सैन्याचा हस्तक्षेप, पीटीआयचे प्रमुख इम्रान खानला मिळतोय फायदा
  बीबीसी (ब्रिटन) :
  नि: पक्ष निवडणुकीच्या पाकिस्तानच्या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह लागले आहे. अनेक विश्लेषक, पत्रकारांशिवाय मानवी हक्क आयोगाने देखील निवडणुकीत हेराफेरी, बळजबरी, आक्रमकता दिसून आल्याचे म्हटले आहे. पीटीआयने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. लष्कराच्या हस्तक्षेपामुळे पीटीआयला थेट फायदा होताना दिसत आहे.

  न्यूयॉर्क टाइम्स (अमेरिका): पाकिस्तानच्या निवडणुकीवर सैन्याचा हस्तक्षेप अशा आशयाचे शीर्षक. सैन्याकडून धमकी मिळत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. लष्कराच्या कोणत्याही हस्तक्षेपाचा फायदा इम्रानलाच मिळताना दिसत आहे. त्यांनी अफगाणिस्तानात अमेरिकेच्या सैन्याला विरोध केला आहे.

  डॉयचे वेले (जर्मनी) : पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीआधी मीडियाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. पत्रकारांच्या म्हणण्यानुसार लष्कर माध्यमांवर नियंत्रणाच्या प्रयत्नात आहे. त्यांच्यावर अनेक बंधने घालण्याचाही डाव दिसत आहे.

  द गार्डियन (ब्रिटन) : पाकिस्तानात २५ जुलै रोजी मतदान होईल. निवडणुकीच्या अगोदर पीएमएल-एनच्या १५ हजाराहून जास्त समर्थकांवर अनेक आरोप लावून त्यांना अटक झाली आहे. अटकसत्र व धमक्यांमुळे पाकिस्तानच्या निवडणुकीत गोंधळाची शक्यता आहे.

Trending