आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाधव प्रकरणात पाकिस्तानचा जबाब जुलैमध्ये दाखल होणार, भारताला देणार प्रत्‍युत्‍तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - भारतीय कैदी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात पाकिस्तान १७ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपला जबाब दाखल करण्याची शक्यता आहे. १७ एप्रिल रोजी भारताने दाखल केलेल्या दाव्याला प्रत्युत्तर म्हणून नवीन शपथपत्र दाखल करणार आहे.  

 

भारताकडून दाखल केलेल्या शपथपत्राची प्रत अद्याप मिळालेली नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतरच या प्रकरणात काही पावले उचलली जाऊ शकतात, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. ‘डॉन’च्या मते, या खटल्यात सुरुवातीला पाकिस्तानची पैरवी करणारे खावर कुरेशी पुन्हा एकदा प्रकरणाला पुढे नेऊ शकतात. पाकिस्तानला सध्या हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताकडून दाखल केलेल्या शपथपत्राची प्रत मिळावी, अशी प्रतीक्षा आहे. ही प्रत पहिल्यांदा पाकिस्तानच्या राजदूत कार्यालयास मिळेल. त्यानंतर पाकिस्तानचे अॅटर्नी त्यावर विचार-विनिमम करतील.  आगामी एक-दोन दिवसांत भारताच्या शपथपत्राची प्रत पाकिस्तानला मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर पाकिस्तान पुढील कारवाई करणार आहे, असे सांगण्यात आले. दुसरीकडे सीमेवर पाककडून गोळीबाराच्या घटना सुरूच आहेत. 

 

 

‘सर्जिकल’संबंधीचे मोदींचे आरोपही फेटाळून लावले:

२०१६ मध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनच्या वेस्टमिन्स्टर हॉलमधील कार्यक्रमातून केलेले दावे पाकिस्तानने फेटाळून लावले. नियंत्रण रेषेजवळ अशी लष्करी कारवाई केल्याचा दावा पाकिस्तानने गुरुवारी अमान्य केला. लष्करी कारवाई केल्यानंतर अगोदर पाकिस्तानला सर्व गोष्टींची माहिती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. परंतु पाकिस्तानकडून कोणताही अधिकारी फोन उचलत नव्हता, असे मोदी ‘भारत की बात सबके साथ’ कार्यक्रमात म्हटले होते. परंतु हा खोटेपणा आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहंमद फैजल यांनी म्हटले आहे.  

बातम्या आणखी आहेत...