आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरावेचक कुटुंबाचा दावा, गीता हीच आमची पूजा, अनेक अर्ज पाकिस्तानातील एनजीओकडे दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईदी फाउंडेशनचे चेअरमन अब्दुल सत्तार ईदीचे पुत्र फैझल ईदी यांच्याशी संकेतांमधून बोलताना गीता. - Divya Marathi
ईदी फाउंडेशनचे चेअरमन अब्दुल सत्तार ईदीचे पुत्र फैझल ईदी यांच्याशी संकेतांमधून बोलताना गीता.
कराची / अमृतसर- ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाची कहाणी गीताच्या जीवनाला वळण देणारी ठरली. तिला भारतात आणण्याचा प्रयत्न होत असतानाच अमृतसरच्या एका झोपडीत राहणाऱ्या दांपत्याने ती आपली मुलगी पूजा असल्याचा दावा केला आहे. त्यांना तीन मुलगे आणि तीन मुली आहेत. त्यांचा मुलगा राजू म्हणाला, आई-वडील कचरावेचक तर आम्ही भावंडे भीक मागण्याचे काम करतो. पूजादेखील भीक मागत असे. त्या दरम्यानच ती रेल्वेस्थानकावरून कदाचित अटारी सीमेवर पोहोचली व तेथून ती सीमेपलीकडे गेली असावी. आणखी चार कुटुंबांचा दावा : गीताला आश्रय देणारी संस्था ईदीशी आणखी चार व्यक्ती आणि कुटुंबांनी संपर्क साधला असून ते तिला आपली मुलगी मानतात. बुधवारी संस्थेकडे असे अर्ज आले आहेत.
संस्थेचे फैझल ईदी म्हणाले, अर्ज करणाऱ्यांपैकी एकही कुटुंब सबळ पुरावा सादर करू शकलेले नाही.
रोजेही ठेवते गीता
तिचा धर्म हिंदू आहे. तिच्या खोलीत देवी-देवतांचे फोटो लावलेले आहेत. ती दिवसांतून पाच वेळा पूजा करते. तिला केवळ १९३ क्रमांक आठवतो. त्याचबरोबर तिला सात भाऊ-बहिणी असल्याचे तिला ठाऊक आहे. तिला हिंदीतून लिहितादेखील येते. ती शाकाहारी आहे आणि रोजेही ठेवते.

सरबजितच्या कुटुंबाकडून दत्तक घेण्याची तयारी
गीताला दत्तक घेण्याची तयारी पाकिस्तान तुरुंगात मृत्यू झालेल्या सरबजित सिंग यांची बहीण दलबीर कौरने दाखवली आहे. फाउंडेशनशीदेखील संपर्क करण्यात आला आहे. त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून परवानगी मागितली आहे. नायब तहसीलदार असलेल्या सरबजितची मोठी मुलगी स्वप्नदीप म्हणाली, गीता तिसऱ्या बहिणीसारखी राहू शकेल. दलबीर कौर म्हणाल्या, कुटुंबाचा शोध लागत नाही, तोपर्यंत ते ठेवून घेतील.
कुटुंब सापडले नाही तरी ते तिला कायमचे ठेवून घेतील.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पुजा करताना गीता
बातम्या आणखी आहेत...