आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये या गुजरातीचा दबदबा, यांच्या अ‍ॅम्ब्युलंसवर होत नाही फायरिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईदी फाऊंडेशनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. त्यांच्याकडे तब्बल 1800 अॅम्ब्युलंस, तीन विमाने आणि एक हेलिकॉप्टर आहे. - Divya Marathi
ईदी फाऊंडेशनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. त्यांच्याकडे तब्बल 1800 अॅम्ब्युलंस, तीन विमाने आणि एक हेलिकॉप्टर आहे.
पेशावर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये डिसेंबर 2014 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 132 चिमुकल्यांसह 142 नागरिक मृत्युमुखी पडले होते. आज असाच एक दहशतवादी हल्ला कराचीमध्ये एका बसवर करण्यात आला. या हल्ल्यात सुमारे 41 जण ठार झाल्याची माहिती समोर येत. कराचीतील सफुरा चौक परिसरात याबसवर हल्ला करण्यात आला आहे. पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्यातील संकटातून बाहेर पडण्यात समाजसेवक अब्दुल सत्तार ईदी यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यावर ईदी फाऊंडेशनच्या अनेक अॅम्ब्युलंस आणि शेकडो समाजसेवी घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी त्यांनी जीवाची जराही पर्वा केली नाही. हल्ल्याच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत हे कार्यकर्ते काम करीत होते.

अब्दुल सत्तार ईदी
हे नाव पाकिस्तानमध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. जनता त्यांना अनेक नावाने ओळखते. काही त्यांना फरिश्ता म्हणतात, काही फादर तेरेसा तर काही दुसरे गांधी. यांच्या फाऊंडेशनचा पाकिस्तानमध्ये एवढा दबदबा आहे, की यांची अ‍ॅम्ब्युलंस फायरिंग सुरु असलेल्या भागात गेली तर तेथील फायरिंग थांबवली जाते. दंगली थांबतात. या अ‍ॅम्ब्युलंसवर कुणी दगडफेक करीत नाही, की नुकसान पोहोचवित नाही.

अब्दुल सत्तार यांचा जन्म गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील बांटवा गावात झाला. पाकिस्तान सरकारने त्यांच्या नावाची तब्बल 16 वेळा नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली. त्यांना 1996 मध्ये भारताकडून गांधी शांती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

पुढील स्लाईडवर वाचा, अब्दुल सत्तार ईदी यांच्या आयुष्याशी निगडित काही बाबी...