आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress In Pakistan Shot Dead In Khyber Pakhtunkhwa

पाकिस्तानात अभिनेत्रीला रस्त्यावरच घातल्या गोळ्या, आईसमोरच केली हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वाह प्रांतामध्ये एका पाकिस्तानी अभिनेत्रीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. दोन अनोळखी दहशतवाद्यांनी रस्त्यावर तिच्या आईसमोरच या अभिनेत्रीला गोळ्या घातल्या. मसरत शाहीन असे या अभिनेत्रीचे नाव आहे.

पाकिस्तचानच्या नौशेरा जिल्ह्यातील ही घटना आहे. मसरत शाहीन नावाची ही पाश्तो अभिनेत्री तिच्या आईबरोबर घराजवळच असलेल्या मार्केटमध्ये खरेदीसाठी जात होती. त्यावेळी दोन जण बाईकवरून आले आणि शाहीनच्या जवळ जाऊन तिला या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. जखमी अवस्थेतील शाहीनला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शाहीनला गोळ्या घातल्यानंतर लगेचच हल्लेखोर बाईकवरून फरार होण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयितांना अटकही करण्यात आली आहे. या हल्ल्यामागचे कारण अजूनही समोर आलेले नसून पोलिस तपास करत आहेत.