आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा पाकिस्तानी झाला कायमचा 'भारतीय', भारत-पाक संघर्षानंतरही दिले होते नागरिकत्व!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अदनान सामी (फाईल फोटो) - Divya Marathi
अदनान सामी (फाईल फोटो)
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तानी गायक व संगीतकार अदनान सामी याला गेल्या वर्षी भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान तणाव व संघर्ष सुरु असतानाही केंद्रीय गृहमंत्रालयाने अदनान सामीला भारताचे नागरिकत्व दिले होते हे विशेष. सामी गेली 15-16 वर्ष भारतात वेळोवेळी व्हिसाची परवानगी घेऊन राहत होता. 2013 मध्ये व्हिसा संपल्यानंतरही सामी भारतात राहत असल्याने मनसेने सामीला 'भारत छोडो' असे सांगितले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनीही त्याला भारत सोडण्याबाबत नोटिस दिली होती. त्यावेळी सामीच्या नागरिकत्वावरून मोठा वाद झाला होता. सामी एका बाजूला ही लढाई लढत होता तर दुसरीकडे त्याला लठ्ठपणाच्या आजाराने आणि कौटुंबिक वादाने छळले होते. आज आम्ही त्याबाबत तुम्हाला माहिती देणार आहोत.
 
मानवतावादी भूमिकेतून दिले नागरिकत्व-
 
- भारतीय कायद्यानुसार विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता आदी क्षेत्रांत विशेष योगदान देणा-या कोणत्याही व्यक्तीला तसेच मानवतावादी भूमिकेतून भारतीय नागरिकत्व देण्याची सोय आहे. 
- सामीचे गायन व संगीत क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्याला भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता.
- केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानी गायक अदनान सामीला भारतीय नागरिकत्व बहाल केल्यानंतर शिवसेनेने मोदी व भाजप सरकारकडे कटाक्ष टाकला होता. 
- मात्र, अदनाम सामीची आई भारतीय असल्याने सेनेनी थोडी नरमाईची भूमिका घेतल्याचे बोलले गेले.  
- आपल्याला माहित असेलच की, शिवसेना, मनसेसारखे पक्ष नेहमीच पाकिस्तानी कलाकारांना विरोध करीत आली आहे.
 
सामीची आई भारतीय-
 
- अदनान सामी यांचा जन्म सन 1969 मध्ये लंडनमध्ये झाला होता. माजी पाकिस्तानी राजकारणी अरशद सामी खान हे अदनान यांचे वडील होते.
- नौरीन खान या अदनानच्या आई होत. त्या मूळ भारतीय असून कश्मिरी होत. अदनान मूळचा पाकिस्तानी वंशाचा असला तरी त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व होते. 
- मात्र, भारताने नागरिकत्व मिळताच त्याने कॅनडाचे नागरिकत्व सोडाले. कारण भारतात दुहेरी नागरिकत्वाचा कायदा नाही.
 
राज ठाकरेंचे धरावे लागले होते पाय-
 
- ऑक्टोबर 2013 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लंडनमध्ये जन्मलेल्या परंतु मूळ पाकिस्तानी असलेल्या गायक अदनान सामीने तत्काळ भारत सोडवा अशी मागणी केली होती. 
- कारण त्यावेळी अदनान याचा व्हिसा संपला होता. त्यानंतर अदनान सामीला मुंबई पोलिसांनी भारत छोडो नोटीस बजावली होती. 
- या वादानंतर अदनान सामीने मनसे प्रमुख राज ठाकरे व मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेऊन व्हिसाबाबत चर्चा केली होती. 
- आपल्या व्हिसाचे केंद्र सरकार नुतनीकरण करणार आहे असे सांगत त्यासंबंधातील कागदपत्रे राज ठाकरेंना दाखवली होती. 
- त्यानंतर वाद शमला होता. अखेर 15 वर्ष भारतात राहिल्यानंतर सामीला भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले.
 
पुढे वाचा, अदनान सामीला छळले लठ्ठपणाच्या आजाराने...
लठ्ठपणाने पत्नीही गेली सोडून,
वाचा अदनान सामीच्या तीन लग्नाच्या कथा...
बातम्या आणखी आहेत...