आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मविरोधी संदेश पाठवल्याने पाकमध्ये हिंदू युवकास अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
इस्लामाबाद - व्हॉट्सअॅपवरून धर्मविरोधी संदेश प्रसारित केल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये एका ३५ वर्षीय हिंदू युवकाला अटक करण्यात आली. संदेश पाठवल्याप्रकरणी जमावाने त्याला घेराव घालून मारहाण सुरू केली होती. मात्र, वेळीच पोलिस पोहाेचल्यामुळे त्याचे प्राण वाचू शकले.
 
प्रकाशकुमार नामक हा युवक दक्षिण बलुचिस्तानच्या हब भागात क्रॉकरीची दुकान चालवतो. पोलिसांनी त्याला अटक करताच जमाव अधिकच आक्रमक आणि हिंसक झाला होता. त्यांनी पोलिस ठाण्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 
बातम्या आणखी आहेत...