आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘उरी’ हल्ल्यानंतर तणाव वाढू लागल्याने उत्तर पाकमधील हवाई सेवा बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उरी परिसरात भारतीय लष्कराची दहशतवाद्यांशी बुधवारी चकमक उडाली होती. - Divya Marathi
उरी परिसरात भारतीय लष्कराची दहशतवाद्यांशी बुधवारी चकमक उडाली होती.
इस्लामाबाद / नवी दिल्ली - उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सने (पीआयए) उत्तरेकडील शहरांची हवाई सेवा रद्द केली आहे. हवाई उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, भारतीय बुधवारी लष्कराने उरी व नौगाव भागात घुसखोरांची तपास मोहिम राबवली.

गिलगिट, स्कार्दु-बाल्टीस्तान या व्याप्त काश्मिर, चित्राल तसेच खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील हवाई सेवा रद्द झाली आहे. नागरी उड्डाण विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सुचनेनुसार बुधवारी ही सेवा रद्द करण्यात आल्याचे पीआयएचे प्रवक्ते दान्याल गिलानी यांनी ट्विटरवरून दिली आहे. ही सेवा नेमकी कोणत्याही कारणामुळे बंद झाली आहे, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. परंतु भारत-पाक यांच्यातील तणावामुळे पाकिस्तानी सैनिक निगराणीसाठी या प्रदेशात हवाई टेहळणी करू शकतात. त्यामुळे प्रवासी विमान सेवा रद्द करण्यात आली असावी, असा दावा पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी केला.

भाषणाच्या अगोदर ‘शरीफ’ चर्चा : संयुक्त राष्ट्रातील आपल्या भाषणाच्या अगोदर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानचे बलाढ्य लष्करप्रमुख राहील शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. दोघांनी रात्री उशिरा काश्मिरमधील स्थितीवर विचारविनिमय केला. त्याचबरोबर दोघांत उरीतील हल्ल्याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दाेघांतील चर्चेचा तपशील मात्र आैपचारिकपणे कोठेही जाहीर करण्यात आलेला नाही. परंतु उरी हल्ल्यानंतरची स्थिती गंभीर बनली आहे, हे मात्र दाेघांमधील चर्चेनंतर स्पष्ट झाल्याचा दावा जिआे टीव्हीने केला आहे.
पुढे वाचा...
> पाकला दहशतवादी देश जाहीर करण्याचा अमेरिकेत प्रस्ताव
> भारत-पाकिस्तानने संयम राखावा, चीनचे आवाहन
> शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन, देशभर संताप
बातम्या आणखी आहेत...