आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लाईटच्या सिढीवरून घसरून पडल्याने दुबईच्या एयर होस्टेसला मिळाली ही शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिएरा बर्के... - Divya Marathi
सिएरा बर्के...
इंटरनॅशनल डेस्क- दुबईतील एमिरेट्स एयरलाईन्समधील या एयर होस्टेसला फक्त यासाठी नोकरीवरून काढून टाकले की, ती विमानाच्या सिढीवरून घसरून खाली पडली. सिएरा बर्के नावाच्या या होस्टेसने सांगितले की, माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे कंपनीने मला फार मोठी शिक्षा दिली. सिएराचे म्हणणे आहे की, अशा छोट्या-मोठ्या घटना कोणसोबतही होऊ शकतात. याचा अर्थ असा नव्हे की त्याच्याविरोधात कठोर निर्णय घ्यावा. काय आहे संपूर्ण प्रकरण...
 
- सिएरा मागील वर्षी एमिरेट्स एयरलाईन्समध्ये एक ट्रेनी एयर होस्टेस म्हणून ज्वॉईन झाली होती. 
- मूळची ऑस्ट्रेलियाची राहणारी सिएरा एयर होस्टेस म्हणून आपले करियर घडवू इच्छित होती. 
- याचमुळे ती ऑस्ट्रेलियाहून दुबईत आली तसेच एक वर्षापर्यंत ‘एमिरेट्स एविएशन कॉलेज’ मधून तिने एयर होस्टेसचे ट्रेनिंग घेतले. 
- सिएरा सांगते की, काही दिवसापूर्वी ती दुबईत फ्लाईट लॅंड झाल्यानंतर ऊंची हीलमुळे अचानक फ्लाईटच्या सिढीवरून घसरली. 
- यात तिच्या गुडघ्याला आणि कमरेला दुखापत झाली. जेव्हा ही बातमी एयरलाईन्स अधिका-यांपर्यंत पोहचली तेव्हा सिएराने निष्काळजीपणा दाखवला असे कारण दिले. यानंतर तिला नोकरीवरून काढून टाकले. 
- याबाबत कंपनीच्या अधिका-यांचे म्हणणे आहे की, जर ती स्वत:ला संभाळू शकत नाही तर पॅसेजर्सची कशी काळजी घेईल. पुढील काही दिवसात तिचे ट्रेनिंग पूर्ण होणार होते. 
- सिएरा सांगते की, पुढील काही दिवसात माझे ट्रेनिंग संपणार होते. मात्र, एयरलाईन्सने माझे करियर सुरु व्हायच्या आधीच संपवून टाकले. 
- ती गेल्या वर्षीपासून एमिरेट्स एयरलाईन्समध्ये ट्रेनिंग घेत होती. या दरम्यान अनके देशांचा दौरा केला व पॅसेजर्संची सेवा केली. 
- कंपनीच्या या निर्णयाने नाराज झालेली सिएरा लागलीच ऑस्ट्रेलिया परत गेली. सिएराला अजूनही एयर होस्टेस बनायचे आहे व तिचे म्हणणे आहे की, मी दुसरीकडे पुन्हा प्रयत्न करणार आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सिएराचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...