आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या 41 दहशतवादी संघटना फेसबुकवर अॅक्टिव्ह, भारत आणि काश्मिर निशाण्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
इस्लामाबाद - पाकिस्तानात प्रतिबंधित 64 दहशतवादी संघटनांपैकी 41 संघटना फेसबुकवर खुलेआम सक्रीय आहेत. ह्या दहशतवादी संघटना भारत आणि काश्मिर संदर्भात द्वेष पसरवण्यासाठी सार्वजनिक प्रचार मोहिम राबवत आहेत. यात कुख्यात दहशतवादी संघटना तालिबानसह लश्कर ए-झांगवीचा देखील समावेश आहे. ़
 
- पाकिस्तानच्या कुख्यात दहशतवादी संघटना एका क्लिकवर पाकच्या कोट्यवधी जनतेशी संवाद साधून शकतात. पाकचे प्रसिद्ध दैनिक 'डॉन'ने ही माहिती प्रसिद्ध केली. सोशल माध्यमांचा वापर करून हे दहशतवादी केवळ जनताच नव्हे, तर एकमेकांच्या सुद्धा संपर्कात आहेत. 
 
- फेसबुकवर अकाउंट चालवणाऱ्या ह्या दहशतवादी संघटनांपैकी काहींना आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले आहे. फेसबुक आणि इतर सोशल संकेतस्थळांवर आपल्या नावांचे शॉर्टकट वापरून ते द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. काही संघटनांनी फेसबुक पेज तयार केले. तर काहींनी वैयक्तिक फेसबुक प्रोफाईल तयार केले आहेत. 
 
- यात लश्कर ए-झांगवी (Lej), तहरीक ए-तालिबान पाकिस्तान (TTP), तहरीक ए-तालिबान स्वात, तहरीक ए-निफात ए-शरिअते मोहम्मदी, तालिबानपासून वेगळ्या झालेल्या दहशतवाद्यांची संघटना जमात उल अहरार अशा विविध संघटनांचा समावेश आहे.
 
- स्थानिकांमध्ये जास्तीत-जास्त प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे दहशतवादी उर्दू आणि रोमन उर्दू भाषेचा वापर करतात. काही दहशतवादी त्या-त्या ठिकाणी प्रचारासाठी स्थानिक भाषांचा सुद्धा वापर करत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...