आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुत्सद्दीपणाचा वापर करा, छुप्या युद्धाचा नव्हे; अमेरिकेने पाकला सुनावले खडे बोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - पाकिस्ताननेआंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र व्यवहारात मुत्सद्दीपणा म्हणजेच कूटनीती - व्यूहात्मक नीतीचा वापर करावा, छुप्या युद्धाचा नव्हे, असे खडे बोल अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल मॅकमास्टर यांनी पाकिस्तानला सुनावले. ते अफगाणिस्तान टेलिव्हिजन वाहिनीवरील मुलाखतीत बोलत होते.
 
मॅकस्टर म्हणाले की, पाक हा हिंसाचारात, दहशतवादाच्या छुप्या युद्धात सहभागी आहे. आता त्यांनी त्यांचे अफगाणिस्तान आणि इतर ठिकाणचे हित थांबवावेत. तालिबान्यांचा छुपी फौज म्हणून पाककडून होणारा वापर तसेच तालिबानी नेत्यांसाठी पाक भूमीचा त्यांना अभय देण्यासाठी होणारा वापर यासह या भूमिकेवर कठोर भूमिका घेण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, आम्ही वर्षानुवर्षे हे पाहतोय. आम्हाला वाटते की, पाक नेत्यांनी हे आता समजावून घेतले पाहिजे. त्यांनी आता त्यांच्या अफगाणिस्तानातील हितांना अमेरिकी धोरणाप्रमाणे मुत्सद्दीपणाने बदलायला हवे. धोकादायक तालिबानी दहशतवाद्यांच्या मदतीने लढविले जाणारे छुपे युद्ध थांबवावे, अन्यथा त्यामुळे हिंसाचारच वाढतो.
 
पाकलाकधी समज येणार - दाऊद मोराडाइन  
न्यूयॉर्कटाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार मॅकमास्टर यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर अफगाण सूत्रे आता या गोष्टींपासून सावध झाली आहेत. त्यांना पाकपुरस्कृत दहशतवादी समूहाच्या धमक्यांचा अर्थ कळतो. पाकला हे कधी कळणार? तालिबान्यांमार्फत पाक आपला अफगाणिस्तानातील युद्ध बेस बनवत आहे. अफगाणिस्तानातील बहुतांश लोकांना पाकच्या अफगाणिस्तानातील भूमिकेसह पाक आणि यूएसमधील संबंधाची आणि पाक तालिबान्यांना देत असलेली सहानुभूती आणि पाठिंब्याचीही कल्पना आहे, असे अफगाणिस्तान इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजचे संचालक दाऊद मोराडाइन म्हणाले. पाकबाबतची आमची नव्या प्रशासनाने प्राधान्यक्रमाने राबविलेली अॅपिसमेंट पॉलिसीचा काहीच परिणाम झाला नाही. आता या धोरणाची पुनर्बांधणी करावी लागेल, असेही ते म्हणाले. आगामी काळात पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उध्वस्त करणे हे प्रमुख ध्येय राहणार आहे.
 
बलुचिस्तान कधीच भारताचा गुलाम होणार नाही
बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांचे विधान इस्लामाबाद : पाकचा बलुचिस्तान प्रांत कधीच भारताचा गुलाम बनणार नाही, असा आशावाद बलुचिस्तानचे मुख्यमंत्री नवाब सनाउल्लाह झेहरी यांनी व्यक्त केला आहे. ते अंजेरा कलात, बलुचिस्तान येथील एका सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होते. येथील लोक कधीही आपल्या शत्रूचा म्हणजे भारताचा अजेंडा प्रांतात राबविणार नाहीत, असे ‘डॉन न्यूज’ने म्हटले आहे. सोशल मीडिया हा काही स्वातंत्र्याचा निकष होऊ शकत नाही. बलुची लोक नेहमीच शांततामय आणि समृद्ध पाकिस्तानच्याच बाजूने उभे राहिलेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...