आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये आणखी ९ अतिरेक्यांना फाशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - दहशतवादाच्या विरोधात कडक भूमिका घेताना पाकिस्तानने १२ अतिरेक्यांना फासावर लटकावल्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा ९ दहशतवाद्यांना फाशी दिली.
पेशावर येथील लष्करी हल्ल्यानंतर सरकारने २००८ पासून सुरू असलेल्या मृत्युदंडावरील बंदी रद्द करून ही शिक्षा पुन्हा सुरू केली. बुधवारी पंजाब, लाहोर, फैसलाबाद, रावळपिंडी, झांग, मिआनवाली, अटोक येथील तुरुंगात ९ दोषींना फाशी दिली. मंगळवारीच १२ दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा दिली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने फासावर देण्याची ही पहिलीच वेळ ठरली होती. आता आणखी ९ जणांना फाशी दिल्यामुळे फाशी दिलेल्यांचा एकूण आकडा ४८ वर पोहोचला आहे. १७ डिसेंबर रोजी तालिबानने पेशावरच्या लष्करी शाळेवर हल्ला केला होता.
त्यात १५० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. देशातील कट्टरवादी गटाने मात्र सरकारची भूमिका चुकीची असल्याचे म्हटले आहे. कबुलीसाठी कैद्यांना बळजबरी केली जाते.
जात आहे. ही प्रक्रिया चुकीची आहे. ती थांबवण्यात यावी, असे या गटाचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...