आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान लष्कराला लक्ष्य करत क्वेटा शहरात स्फोट; 8 जवानांसमवेत 17 जणांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटामुळे लागलेल्या आगीत अनेक वाहने जळून खाक झाली. - Divya Marathi
स्फोटामुळे लागलेल्या आगीत अनेक वाहने जळून खाक झाली.
कराची- पाकिस्तानातील क्वेटा शहरात लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करत स्फोट करण्यात आला या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले आहेत. जिओ टीव्ही दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी रात्री उशिरा पिशिन बसथांब्यालगत हा स्फोट झाला. हा कडक सुरक्षाव्यवस्था असणारा भाग आहे. बलूचिस्तानचे गृहमंत्री मीर सरफराज बुगती यांनी फ्रंटियर कोरच्या एका ट्रकला लक्ष्य करुन हा स्फोट करण्यात आल्याचे सांगितले.
 
14 ऑगस्टला आहे पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन
- इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन (ISPR) चे डीजी मेजर जनरल आसिफ गफूर य़ांनी ट्विट केले की, स्वातंत्र्य दिन समारंभावर प्रभाव टाकण्यासाठी हा स्फोट करण्यात आला आहे. आम्ही अशा आव्हानांसमोर गुडघे टेकवणार नाही.
- सोमवारी 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे.
- हल्ल्यानंतर लष्कराने या भागाला वेढा घातला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.
 
आत्मघातकी हल्ला की बॉम्बस्फोट?
- बुगती यांनी सांगितले की, बॉम्बशोधक पथक याचा तपास करत आहे की हा आत्मघातकी हल्ला होता का? आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
- त्यांनी सांगितले की 30 जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. यातील 6 ते 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 
बातम्या आणखी आहेत...