आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीफ हल्ल्यात बचावले बनावट नंबरच्या कारची ताफ्यात घुसून कारला धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यात थोडक्यात बचावले. कुटुंबीयांसोबत ते मुरीहून इस्लामाबादला परत येत होते. तेव्हा एका कारने त्यांच्या ताफ्याला ओव्हरटेक केले. त्यानंतर मागाहून त्यांच्या कारला धडक दिली. अर्थात शरीफ व कारमधील इतर लोक सुखरूप आहेत. पंतप्रधान कार्यालयानुसार सुरक्षा रक्षकांनी ती कार थांबवली. त्यावर बनावट नंबर प्लेट असल्याचे समजते. चालकाला अटक करून चौकशी सुरू आहे. यामागे लष्कर-ए-झांगवी या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे.
बातम्या आणखी आहेत...