आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसचे कृत्य: बलुच पोलिस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला, 61 प्रशिक्षणार्थींचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वेटा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या होस्टेलवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. - Divya Marathi
क्वेटा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या होस्टेलवर दहशतवादी हल्ला करण्यात आला.
क्वेट्टा- पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये पोलिस प्रशिक्षण केंद्रावर मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. त्यात किमान ६१ प्रशिक्षणार्थींचा मृत्यू तर १२५ जण जखमी झाले. त्यात २० जण गंभीर आहेत. हल्ल्याची जबाबदारी इसिसने घेतली आहे. परंतु हा हल्ला लष्कर-ए-झांग्वीच्या दहशतवाद्यांनी केल्याचा दावा पाक सरकारने केला आहे.

फ्रंटियर कोरचे आयजी मेजर जनरल शेर अफगाण म्हणाले, सोमवारी उशिरा रात्री तीन दहशतवाद्यांनी महाविद्यालयावर हल्ला केला. त्यावेळी महाविद्यालयात सुमारे ७०० विद्यार्थी होते. हल्लेखोर मशिन गनने अंदाधुंद गोळीबार करतच महाविद्यालयात घुसले. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्येच एकच गोंधळ उडाला होता. आमची तुकडी तेथे दाखल झाल्याच्या तीन तासांतच आम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. महाविद्यालयात अडकलेल्या २५० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मात्र चार तास लागले. ही कारवाई मंगळवारी सकाळपर्यंत चालली. दोन हल्लेखोरांनी एका खोलीत जाऊन स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिले. त्यामुळे खोलीत आजुबाजूचे विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सैन्याने हल्ला केला. त्यात तिसऱ्या हल्लेखाेराचा खात्मा झाला.

दहशतवादी हल्ल्यादरम्यान अफगाणिस्तानात बसलेल्या आपल्या म्होरक्यांशी फोनवरून संभाषण करत होते. मंगळवारी लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाचा दौरा केला. पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही सर्व कार्यक्रम गुंडाळून क्वेट्टा गाठले. दरम्यान, हल्ल्याच्या एक दिवस अगोदर फुटीरवादी संघटना बलूच लिबरेशन आर्मीच्या बंदुकधाऱ्यांनी ग्वाडर बंदराजवळ तीन जणांना गोळी घालून ठार केले होते.

हल्ला कोणी केला?
तीन हल्लेखोर आमचे लढवय्ये होते असा दावा इसिसने केला आहे. परंतु हल्लेखोर हे लष्कर-ए-झांग्वी गटाने हा हल्ला केल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

मुकाबला करण्याऐवजी भावी पोलिसांचे पलायन
हल्लेखाेरांनी एका गार्डची हत्या केल्यानंतर पोलिस प्रशिक्षण महाविद्यालय वसतिगृहात रात्री ११ च्या सुमारास घुसले. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर तेथे झोपेत असलेल्या ७०० भावी पोलिसांनी पळायला सुरुवात केली. परिस्थितीचा मुकाबला करण्याऐवजी भावी पोलिसांनी मात्र पळपुटेपणा केला, असे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे.

संवेदनशील भाग, पूर्वीही दोन हल्ले
पोलिस प्रशिक्षण महाविद्यालय सरीब मार्गावर आहे. हे महाविद्यालय क्वेट्टामधील अतिशय संवेदनशील भाग मानला जातो. अगोदर दोन वेळा दहशतवादी हल्ले झाले आहेत. २००६ मधील हल्ल्यात सहा पोलिसांचा मृत्यू झाला होता. २००८ च्या हल्ल्यात पाच पोलिसांचा मृत्यू झाला होता.

पाकिस्तानातील तिसरा मोठा हल्ला
पाकिस्तानातील हा तिसरा सर्वात मोठा हल्ला आहे. २७ मार्च रोजी गुलशन-ए-इक्बाल उद्यानावर आत्मघाती हल्ल्यात ७४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात ३३८ जण जखमी झाले होते. ऑगस्टमध्ये सरकारी रुग्णालयावर आत्मघाती हल्ला झाला होता. त्यात ७३ ठार झाले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हल्ल्यानंतरची स्थिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...