आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानी अड्ड्यांवर बाॅम्ब डागा, म्होरक्याही ठार करा - पाक‘बोल’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - तेरहिक-ए-तालिबान पाकिस्तानचे अफगाणिस्तानातील अड्डे नष्ट करा व संघटनेचा म्होरक्या मुल्ला फजलुल्लास ठार करा, अशी मागणी पाकिस्तानचे बलाढ्य लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी अमेरिकेकडे केली आहे.

एका उच्चस्तरीय बैठकीत शरीफ यांनी ही मागणी केली. बैठकीला अफगाणिस्तानातील मित्र राष्ट्रांच्या माेहिमेचे प्रमुख जॉन निकोल्सन, अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी रिचर्ड आेल्सन यांची उपस्थिती होती. ही बैठक शुक्रवारी घेण्यात आली. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान दहशतवादी व मुल्ला फजलुल्ला यांना अड्ड्यात ठार करा. दहशतवाद्यांचे अफगाणिस्तानातील अड्डे नष्ट करणे महत्त्वाचे आहे. अफगाण-तालिबानचा म्होरक्या मुल्ला मन्सूरचा सीआयएच्या ड्रोनने खात्मा केला होता. २१ मे च्या घटनेमुळे दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतरची अमेरिकेच्या वरिष्ठ पातळीवरील प्रतिनिधींचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा आहे.
पाकिस्तानी लष्कराकडून अमेरिकेच्या बलुचिस्तानमधील हल्ल्याबाबत चर्चा करण्यात येत आहे. सार्वभौमत्वाचा हा मुद्दा आहे. त्यावर देश चिंतित आहे. अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे उभय देशांतील विश्वास, आदराच्या भावनेवर कसा परिणाम झाला, याबद्दलही राहील यांनी अमेरिकेच्या प्रतिनिधींनी अवगत करून दिले.

अमेरिकेच्या फौजा पुन्हा सक्रिय होणार
हिंसाचारामध्ये होरपळणाऱ्या अफगाणिस्तानात अमेरिकेच्या फौजा पुन्हा सक्रिय होणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचे निवडक सैन्य केवळ प्रशिक्षणासाठी होते. परंतु आता अफगाणिस्तानच्या सैन्यासोबत दहशतवादविरोधी लष्करी मोहिमांत सक्रिय होईल. राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती गंभीर बनली आहे. तालिबान काबूलपासून कोणत्याही ठिकाणी हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळेच अमेरिकेने पुन्हा सक्रिय सहभागाचा निर्णय घेतला. वास्तविक २०१४ मध्ये अमेरिकेने लष्करी सक्रियता संपवली होती.
‘शांततेसाठी सातत्याने काम’
प्रादेशिक तसेच अफगाण-पाक सीमेवरील अस्थैर्यासाठी दरवेळी पाकिस्तानला जबाबदार मानले जाते. हे दुर्दैव आहे. वास्तविक देश सातत्याने शांततेसाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळेच अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान व अमेरिका यांच्यासोबत आम्ही शांततेच्या प्रयत्नात सक्रिय आहोत, असे शरीफ म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...