आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलुचांचे पाकिस्तानात पुन्हा आंदोलन, पाकिस्तान आणि चीनविरोधात घोषणाबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलूच नागरिकांना पाकिस्तानमधून स्वातंत्र्य हवे आहे. - Divya Marathi
बलूच नागरिकांना पाकिस्तानमधून स्वातंत्र्य हवे आहे.
क्वेटा - बलुचिस्तानच्या नागरिकांनी पाकिस्तानच्या क्वेटाजवळ आंदोलन केले. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरचा हे लोक विरोध करत आहेत. आंदोलकांनी स्वातंत्र्याबाबत घोषणाबाजी केली तसेच चीनच्या हस्तक्षेपाचा विरोधही केला. याआधीही बलूच नागरिकांनी पाकिस्तानात नवाज सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून गेलेल्या भाषणादरम्यान बलुचिस्तानचा उल्लेख केला होता. तेव्हापासून जगभरात बलुचिस्तानच्या नेत्यांनी आंदोलन केले आहे.

असे केले आंदोलन..
- नागरिकांनी क्वेटाच्या जवळ रस्त्याच्या कडेला उभे राहून पाक-चीनच्या विरोधात घोषणाबाजी केली.
- पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळण्याची मागणी हे नागरिक करत होते. याठिकाणी नारिकांनी नवाज शरीफ यांचे पुतळे आणि पोस्टर जाळले.

जगभरात आंदोलन सुरू
- बलूच नेते लंडन, ऑस्ट्रेलिया, साऊथ कोरिया, जर्मनी, न्यूयॉर्कमध्ये आंदोलन करून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत.
- बलूच नेते ब्राहमदाग बुगती म्हणाले होते, की बलुचिस्तानात पाकिस्तान मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे.
- एक नेता म्हणाला, मोदीजी बलूच महिला तुम्हाला भाऊ मानतात, आम्ही आमची लढाई लढतो तुम्ही फक्त आमचा आवाज पोहोचवा.
- पाकव्याप्त काश्मिरातही स्थानिक नेत्यांनी दहशतवादी तळांना रसद पुरवणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
- दहशतवादी तळांमुळे याठिकाणचे जीवन नरकासमान बनल्याचे पीओकेमधील नागरिकांनी म्हटले आहे.
पुढे पाहा, आंदोलनाचे काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...