आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलुचिस्तानात पाकिस्तानी ध्वजाची होळी, भारत समर्थनार्थ घोषणाबाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी शुक्रवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अफगाण सीमेवर काही लोकांनी पाकचा ध्वज जाळून ‘गेट-ए-चमन’वर हल्ला केला. दरम्यान, याच सीमेवरील एका गावात लोकांनी भारताच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत पाकविरोधी निदर्शने केली.

बलुचिस्तानवर १५ ऑगस्टच्या मोदींच्या वक्तव्याचा निषेध म्हणून पाकिस्तानात निदर्शने पेटली. त्याविरुद्ध शनिवारी अफगाण सीमा भागात अनेक लेाक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा देत पाकविरोधी घोषणा दिल्या.

गेट-ए-चमन हे अफगाण-पाकच्या मैत्रीचे प्रतीक मानले जाते. बलुचिस्तान हद्दीत असलेल्या या गेटवर लोकांनी दगडफेक केली. यामुळे काही वेळ या भागात तणाव होता. या तणावामुळे दोन्ही देशांदरम्यान अत्यावश्यक वस्तूंची होणारी वाहतूकही खोळंबली.
बातम्या आणखी आहेत...