आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतका सुंदर, निसर्गरम्य आहे ‘बलूचिस्तान’, काय तुम्ही पाहिलेत हे PHOTOS?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलूचिस्तान इतका सुंदर, निसर्गरम्य आहे. - Divya Marathi
बलूचिस्तान इतका सुंदर, निसर्गरम्य आहे.
इंटरनॅशनल डेस्क- जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानचा पश्चिमी प्रांत असलेल्या ‘बलूचिस्तान’चा मुद्दा उपस्थित केला तेव्हापासून पाकिस्तान भडकला आहे. दुसरीकडे, बलुची नेते मोदींचे जोरदार कौतूक करत आहेत तसेच त्यांना विनंती करत आहेत की, बलूचिस्तानच्या स्वतंत्र्याचा मुद्दा यूनोमध्ये उपस्थित करावा. याच नैराश्याच्या पोटी आता पाकिस्तानने भारताला धमकी दिली आहे की, भारताने आमच्या अंतर्गत (बलूचिस्तान) बाबींत लक्ष घालण्याची गरज नाही अन्यथा आम्हीही खलिस्तानचा मुद्दा उचलून धरू. खरं तर बलूचिस्तान पाकिस्तानमधील पश्चिमी प्रांत आहे. बलूचिस्तान इराण आणि अफगानिस्तानच्या सीमेलगत पसरला आहे. बलूचिस्तानची राजधानी क्वेटा आहे. कबिलाई सरदारांचा चालतो कायदा...
- बलूचिस्तान सध्या हिंसा आणि अंतर्गत यादवीने त्रस्त आहे. पाकिस्तान याला अनेक वर्षापासून भारताला जबाबदार धरत आला आहे.
- खरं सत्य तर हे आहे की, बलूचिस्तान हा असा प्रांत आहे जो कधी पाकिस्तान सरकारच्या ताब्यात कधी आलाच नाही.
- येथे कबिलाई सरदारांचे राज्य आहे व तेथेच ते म्हणेल तोच कायदा आहे. भारतात शरण आलेला बलूचिस्तान नेता पुरदली याने मात्र पाकिस्तानचा भारताबाबतचा दावा साफ फेटाळून लावत आहेत.
- पुरदली स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, पाकिस्तानी सरकारने आतापर्यंत सुमारे 19 हजार बलुची लोकांना मारून टाकले आहे.
- भारत जेव्हा कधी कश्मीरमधील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करतो तेव्हा पाकिस्तान त्याबदल्यात बलूचिस्तानचा विषय मध्येच काढते.
ब्रिटिश काळात बलूचिस्तानमध्ये कलात रियासत होती सत्तेत-
- सध्याचे बलुचे लोकांचे आंदोलन 1666 मध्ये बलुचिस्तानचा भाग कलात येथे मीर अहमदची ‘खानत’ (सत्ता, संस्थान) होती.
- भारताची फाळणी झाली तेव्हा ब्रिटिश शासन काळात तेथे कलात रियासत सत्तेत होती. कलात रिसायतने त्यावेळी पाकिस्तानमध्ये सामील होण्यास नकार दिला होता.
- मार्च 1948 मध्ये पाकिस्तानने लष्कर पाठवून तेथील शासक यार खानला बलुची प्रांत पाकमध्ये सामील करण्यास बळजबरीने भाग पाडले.
- मात्र, यार खानच्या कुटुंबियांना हे पसंत नव्हते. त्यांनी पाकविरूद्ध सुरु केलेला संघर्ष आजपर्यंत सुरु आहे.
पाकिस्तानसाठी सोन्याची खाण-
- पाकिस्तानसाठी बलूचिस्तानचे खूप महत्व आहे. कारण तेथे गॅस, यूरेनियम, तांबे, सोने आणि इतर धातूंचा मुबलक प्रमाणात साठा आहे.
- येथील गॅस साठ्यातूनच निम्म्या पाकिस्तानची गरज भागते. मध्य आशियात प्रवेशासाठी चीन जे ग्वांदर बंदर निर्माण करत आहे ते तेथेच आहे.
- तसेच इराण-पाकिस्तान गॅस पाईपलाईनची चर्चा सुरु आहे ती सुद्धा बलूचिस्तानमधून येणार आहे.
- बलूचिस्तान नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला व परिपूर्ण प्रदेश आहे. तसेच निसर्गाने बलुचिस्तानला भरभरून सौंदर्य बहाल केले आहे.
चला तर यानिमित्त आपण पाहूया बलूचिस्तानचे सुंदर सुंदर फोटो...
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बलूचिस्तानचा खूबसूरत नजारा.. (सर्व फोटो: इंटरनेटवरील विविध स्त्रोतातून एकत्र केले आहेत)
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...