आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्सफोर्डची बिनधास्त पार्टी गर्ल, 35 व्या वर्षी बनली होती पाकिस्तानची PM

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेनझीर भुत्तो यांचे फाईल फोटो... - Divya Marathi
बेनझीर भुत्तो यांचे फाईल फोटो...
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तानची दोन वेळा पंतप्रधान राहिलेल्या बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कोर्टाने गुरुवारी निर्णय दिला. या प्रकरणात दोघांना 17 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली तर पाच जणांना निर्दोष मानले. तर, पाकिस्तानाचे माजी लष्करप्रमुख व हुकुमशहा राहिलेले राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना फरार घोषित करण्यात आले. 27 डिसेंबर 2007 रोजी रावळपिंडीत एका रॅलीदरम्यान बॉम्बस्फोट घडवून बेनझीर यांची हत्या करण्यात आली होती. पाकिस्तानातील सर्वात मोठ्या राजघराण्यात जन्माला आलेली बेनझीर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांची कन्या होती आणि वयाच्या 35 व्या वर्षी देशाची पंतप्रधान बनली होती. 1988-90 आणि 1993-96 या काळात बेनझीर दोन वेळा देशाच्या पंतप्रधान राहिल्या. ऑक्सफोर्डची बिंनधास्त मुलगी होती बेनझीर...
 
- बेनझीर यांचे शालेय शिक्षण पाकिस्तानातील कॉन्वेंट स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. 
- अमेरिकेतील हार्वर्डमधून डिग्री घेतल्यानंतर बेनझीर इंटरनॅशनल लॉ एंड डिप्लोमेसी कोर्ससाठी ऑक्सफोर्डला गेल्या. 
- ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीत शिक्षण घेत असताना त्या आपल्या पार्टीजसाठी प्रसिद्ध होत्या. 
- त्या काळात त्या यलो कलरची एमजी कार वापरायच्या. तसेच आपल्या घरी त्यांची ओळख एक वेस्टर्नाइज टीनेजर म्हणून होती. 
- अमेरिकी स्टोर साक्स फिफ्थ एवेन्यू हे त्यांचे कपड्यासाठी आवडते ठिकाण होते. त्यांची लाईफस्टाईल एखाद्या श्रीमंत विदेशी तरूणीसारखी होती. 
- ऑक्सफोर्डमध्ये होणा-या सर्व पार्टीत त्या दिसायच्या. सोबतच ड्रिंक आणि डान्स दोन्हीही एन्जॉय करायच्या. 
- या दरम्यान त्यांच्यासमवेत शिकलेल्या सहका-यांनीही याला दुजोरा दिला होता. मात्र, त्यांनी नेहमीच त्याचा इन्कार केला. 
- त्यांच्या सोबत शिकलेल्या सहका-यांनीी सांगितले होते की, ऑक्सफोर्डमध्ये त्यांची लाइफ एक कट्टर मुस्लिम परिवारातून मुक्त झालेल्या एखाद्या श्रीमंत इस्लामी तरूणीसारखी होती.
 
पाकिस्तानची बनली पीएम-
 
- पाकिस्तानमध्ये झिया उल हक यांच्या काळात (1979) बेनझीरचे पिता आणि माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना फासावर लटकविण्यात आले.
- पित्याच्या मृत्यूनंतर बेनझीरने वडिलांची पार्टी (पाकिस्तान पीपुल्स पार्टी) मधून राजकारणाला सुरुवात केली. वयाच्या 29 वर्षी त्या पार्टीच्या चेयरपर्सन बनल्या.
- असे असले तरी, वडिलांच्या मृत्यूनंतर त्या सुमारे तीन वर्षे देशाच्या लष्करी सरकारच्या ताब्यात राहिल्या. ही कैद संपल्यानंतर त्यांना विदेशात जाण्याची परवानगी मिळाली आणि त्या लंडनला गेल्या.
- 1987 मध्ये भुट्टोने आसिफ अली झरदारी यांच्यासोबत लग्न केले होते.
- 1988 मध्ये त्यांनी इंग्लंडमधून पाकिस्तानात येण्याची परवानगी मिळवली आणि त्याच वर्षी त्यांच्या पार्टीने सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवून विजय खेचून आणला. त्यांनी आघाडीचे सरकार बनवले आणि पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
- मात्र, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवत बेनझीर यांना 1999 मध्ये पुन्हा एकदा देश सोडायला भाग पडले होते.
 
2007 साली प्रचार सभेत झाली हत्या-
 
- 2007 मध्ये जेव्हा पाकिस्तानमधील लष्कराची ताकद कमकुवत होत होती आणि देशातील लोकशाही देखील मृत्यूपंथाला लागण्याची चिन्हे होती तेव्हा नऊ वर्षांच्या विजनवासानंतर त्या पाकिस्तानात परतल्या होत्या.
- तेव्हा पाकिस्तानमध्ये परवेझ मुशर्रफ यांचे सरकार होते. मुशर्रफ सरकारने त्यांना मायदेशात परतण्याची परवानगी दिली आणि त्यासोबतच जीविताला धोका असण्याचा इशारा देखील दिला होता.
- बेनझीर दुबईहून कराचीसाठी निघाल्या तेव्हा म्हणाल्या होत्या, 'सर्वात मोठी सुरक्षा 'खुदा'ची आहे. त्याने जर ठरविले तर सर्वकाही व्यवस्थित होईल.'
- मात्र, पुढे डिसेंबर महिन्यात रावळपिंडीत प्रचार सभा आटोपून जात असताना दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत:ला आत्मघातकी हल्ल्यात उडवून दिले. प्रचंड रक्त शरीरातून बाहेर पडल्याने बेनझीर यांचा हल्ल्यानंतर तासाभरातच मृत्यू झाला होता.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, पाकच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे तारूण्यातील फोटोज....
बातम्या आणखी आहेत...