आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAKमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बसमध्ये बॉम्बस्फोट; 15 ठार, 25 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - पाकिस्तानच्या पेशावर शहरात बुधवारी सकाळी शासकीय कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये बॉम्बस्फोट झाला. स्फोटात 15 कर्मचारी मारले गेले. तर, 25 जण जखमी झाले आहेत. यातील अनेकांची स्थिती गंभीर आहे.

बसमध्ये आधीच ठेवला होता बॉम्ब
- भारतीय प्रमाण वेळेनूसार सकाळी 8.37 वाजता बॉम्बस्फोट झाला.
- 'डॉन न्यूज'च्या वृत्तानुसार, ही बस शासकीय कर्मचाऱ्यासाठी असते.
- बुधवारी सकाळी बस सिव्हिल सेक्रेटेरिएटकडे रवाना झाली. बस सुनहरी मशिद परिसरात आल्याबरोबर त्यात मोठा स्फोट झाला.
- काही वेळातच तिथे बसचा सांगाडा पडलेला होता आणि त्यात मृतदेह होते. सुरक्षा यंत्रणांनी परिसराला घेराव टाकला आहे.
- अजूनपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही.
- जखमींना लेडी रीडिंग हॉस्पिटलसह आणखी तीन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
- एका वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार 49 जखमींना चार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
- पेशावरचे पोलिस अधीक्षक मोहम्मद काशिफ म्हणाले, बसमध्ये आधीच बॉम्ब प्लांट करुन ठेवण्यात आला होता. मृतांमध्ये एक पोलिस अधिकारी देखिल आहे.

कुठे झाला स्फोट
- सुनहरी मशिदसमोर बॉम्ब स्फोट झाला.
- बसच्या आतमध्ये सीट खाली बॉम्ब ठेवण्यात आला होता.
- 8 किलोचा शक्तीशाली टाइमर बॉम्ब बसच्या सीट खाली ठेवण्यात आला होता.
- मृतांमध्ये अनेक सरकारी कर्मचारी आहेत.
- बसमध्ये 40-50 प्रवाशी होते.
- जखमींनी पेशावरमधील तीन मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याआधी केव्हा झाले हल्ले
- 20 जानेवारी 2016 ला वायव्य पाकिस्तानमधील चरसड्डा जिल्‍ह्यातील बचा खान विद्यापीठात 10 दहशतवाद्यांनी हल्‍ला केला होता. यात 21 जण ठार झाले असून, 50 पेक्षा अधिक गंभीर जखमी झाले होते.
- 16 डिसेंबर 2014 रोजी पेशावरच्या आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 148 लोक मारले गेले होते. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यातील 4 दहशतवाद्यांना लष्‍करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.
पुढील स्लाइडमध्ये, तत्काळा पोहोचले बचाव पथक
बातम्या आणखी आहेत...