आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुशर्रफ यांना न्यायालयाकडून दिलासा; बुगती हत्याप्रकरणी सवलत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना पाकमधील नेते नवाब अकबर खान बुगती यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित न राहण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. क्वेटाच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने त्यांना ही सवलत देऊ केली आहे.

२००६ मध्ये मुशर्रफ पाकच्या लष्करप्रमुख आणि राष्ट्रपतिपदावर विराजमान असताना बुगती यांची लष्करांच्या कारवाईदरम्यान हत्या करण्यात आली होती. दरम्यान, क्वेटा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यासाठी मुशर्रफ यांनी सुनावणीदरम्यान आपल्याला न्यायालयात उपस्थित न राहण्याची सवलत देण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती आफताब अहमद यांनी त्यांच्या याचिकेवर सुनावणी करत त्यांच्यासह माजी मंत्री आफताब अहमद खान शेर्पाओ यांनाही याप्रकरणी सवलत दिली. या प्रकरणाची यापुढील सुनावणी १ जून रोजी होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...