आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charsadda Terror Attack: 21 Dead At Bacha Khan University

PAK: विद्यापीठ हल्‍ल्‍यानंतर समोर आले हॉस्‍टेलमधील थरारक PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉस्‍टेलच्‍या खोलीत पडलेला रक्‍ताचा सडा. - Divya Marathi
हॉस्‍टेलच्‍या खोलीत पडलेला रक्‍ताचा सडा.
पेशावर - पाकिस्‍तानातील चरसद्दा जिल्‍ह्यातील बाचा खान विद्यापीठात बुधवारी दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. यात 21 जण मृत्‍यूमुखी पडले. दहशतवाद्यांनी हॉस्‍टेलच्‍या खोल्‍यांमध्‍ये घुसून विद्यार्थ्‍यांना गोळ्या घातल्‍या. या घटनेनंतर हॉस्‍टेलमधील फोटोज समोर आले असून, दहशतवादी अधिकाधिक विद्यार्थ्‍यांना ठार करण्‍याचा प्रयत्‍न करत असल्‍याचे त्‍यातून उघड झाले. दरम्‍यान, पाकिस्‍तानी गुप्‍तचर संस्‍थेने हल्‍लेखोर कोण होते, याचा शोध घेतला आहे. शिवाय त्‍यांचे फोन कॉल्‍स ट्रेस केले.
हॉस्‍टेलमध्‍ये कसे घुसले दहशतवादी....
- ज्‍या वेळी हा हल्‍ला झाला त्‍यावेळी खूप दाट धुके होते. त्‍याचा फायदा घेत चार दहशतवादी मुलांच्‍या वसतिगृहाजवळ असलेल्‍या मागच्‍या संरक्षण भिंतीवरून उडी मारून आत आले.
- त्‍यांनी सुरुवातीला हॉस्‍टेलमध्‍येच हल्‍ला केला. नंतर ते वर्ग खोल्‍यांमध्‍ये आणि मुशायऱ्याच्‍या ठिकाणी गेले.
- एके-47 मधून फायरिंग सुरू केली. नंतर एकापाठोपाठ एक बॉम्‍बस्‍फोट झाले.
कसा आणि कुठे झाला हल्‍ला ?
- हा हल्‍ला वायव्य पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वाहमधील बाचा खान विद्यापीठात बुधवारी सकाळी 9 वाजून 13 मिनिटांनी झाला.
- हे विद्यापीठ पेशावरपासून 50 किमी अंतरावर चरसद्दा या जिल्‍हा ठिकाणी आहे.
- विद्यापीठातील प्राध्‍यापक सैयद हामिद हुसैन यांच्‍यासह 21 लोकांचा मृत्‍यू झाला तर 50 पेक्षा अधिक जखमी झाले. (सविस्‍तर वाचा)
- पाकिस्‍तानी लष्‍काराने चारही दहशतवाद्यांना ठार केले.
विद्यापीठाला कुणाचे नाव आहे...
हल्ल्याच्या वेळी विद्यापीठात खान अब्दुल गफार खान यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुशायरा सुरू होता. गफ्फार खान हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महानायकांपैकी एक होते. त्यांना बाचा खानही संबोधले जात असे. त्यांच्या नावानेच हे विद्यापीठ स्थापन झाले आहे. ( बाचा खान यांच्‍या विषयी सविस्‍तर वाचा)
आतापर्यंत का माहिती मिळाली ?
- इंटर सर्व्‍हीसेस पब्लिक रिलेशनचे (आयएसपीआए) डायरेक्टर जनलर लेफ्टिनेंट असीम बाजवा यांनी सांगितले की, हल्‍लेखोरांची ओळख पटली आहे.
- त्‍यांचे कॉल ट्रेस केले असून, त्‍याचा अॅनालिसिस केले जात आहे.
- बाजवा म्‍हणाले, जेव्‍हा आर्मीचे जवान विद्यापीठात पोहोचले त्‍यावेळी चारही हल्‍लेखोर जिवंत होते. हॉस्‍टेलमध्‍ये घुसून त्‍यांना हैदोस घालायचा होता.
- त्‍यांच्‍याकडे मोठ्या प्रमाणात शस्‍त्र आणि दारूगोळा होता.
- फिंगरप्रिंट्सची तपासले जात आहेत.
- हे चारही हल्‍लेखोर 18 वर्षांतील होतील.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हॉस्‍टेलचे फोटोज..