Home »International »Pakistan» Child Marriages Big Issue In Todays Modern World

कथा अत्याचाराच्या: या जोड्या पाहून बसेल धक्का, लहान वयातच भोगावे लागते सर्व

दिव्यमराठी वेब टीम | Sep 13, 2017, 10:33 AM IST

इंटरनॅशनल डेस्क- मुंबईतील एका 13 वर्षीय मुलीवर मातृत्त्व लादले गेले. मुंबईतील ही बलात्कारातून गरोदर राहिली आणि मागील आठवड्यात त्या मुलीने सुमारे दोन किलो वजनाच्या मुलाला जन्म दिला. मात्र, उपचारादरम्यान तिच्या बाळाचा मृत्यू झाला. सिजेरीन करून तिने बाळाला जन्म दिला होता. मात्र, तिच्या बाळाचा मृत्यू होताच तिच्यावर मानसिक उपचार सुरु करण्यात आले आहेत. मुंबईसारख्या जागतिक शहरात 13 वर्षीय मुलीवर मातृत्त्व लादल्याने खूप टीका झाली. मात्र, हे काही भारतातच घडत आहे असे नाही. जगभरातील बहुतेक विकसनशील देशांतच नव्हे तर विकसित देशांतही जवळपास अल्पवयीन मुलींची हीच स्थिती आहे. अफगाणिस्तानमध्‍ये गेल्या वर्षी एका सहा वर्षांच्या मुलीचा विवाह 50 वर्षांच्या मौलवीशी लावून दिला होता. 70 कोटी महिलांचा झालाय बालविवाह...
- युनिसेफच्या 2014 मधील आकड्यांनुसार गेल्या तीन दशकांमध्‍ये अशा प्रकरणात घट झाली आहे. मात्र जगभरात आताही 70 कोटी महिला अशा आहेत ज्यांचा बालविवाह झाला आहे.
- यात प्रत्येक तीनमधील एक म्हणजे 25 कोटी अशा आहेत ज्यांचा विवाह 15 पेक्षा कमी वयात झाला होता. याचा वाईट परिणाम त्यांच्या शरीराबरोबरच त्यांच्या होणा-या बाळांवर दिसतो.
- तसेच त्या लैंगिक शोषणाच्या शिकार होण्‍याची शक्यताही इतर महिलांच्या तुलनेत जास्त आहे.
शरीरावर वाईट परिणाम-
- कमी वयात विवाह करणा-या मुलींना भविष्‍यात मानसिक आजारांसारखे नैराश्‍य व तणावात जाण्‍याची शक्यता 41 टक्क्यांनी वाढते.
- प्रसुतीच्या वेळी 20 पेक्षा जास्त वयाच्या महिलांच्या तुलनेत यांच्या मृत्यूची शक्यता पाचपटीने जास्त असतो.
- असे सर्व असताना आग्नेय आशिया, मध्‍यपूर्व देश आणि काही आफ्र‍िकन देशांमध्‍ये आजही बालविवाह प्रचलित आहे.
- काही ठिकाणी विवाहासाठी बनवलेले कायदे-नियम धाब्यावर बसवून गपचूप विवाह केला जात आहे.
पुढील स्लाईड्सद्वारे पाहा, बालविवाहाची भेट म्हणून दिलेल्या जगभरातील मुलींचे फोटोज...

Next Article

Recommended