आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचा पाकिस्तानमध्‍ये सर्वात मोठे राजदूत कार्यालय सुरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: चीनचे परराष्‍ट्रमंत्री वांग यी आणि पाकिस्तानचे राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज.
इस्लामाबाद - चीनने पाकिस्तानमध्‍ये आपले सर्वात मोठे राजदूत कार्यालय सुरु केले आहे. हे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रसंगी दोन्ही राष्‍ट्रांमधील मैत्रीचे प्रतिक असेल, असे चीनचे परराष्‍ट्रमंत्री वांग यी यांनी म्हटले आहे. चीनचे परदेशातील सर्वात मोठे राजदूत कार्यालय हे चीन आणि पाकिस्तानमधील मैत्रीचे प्रतिक आहे, असे परराष्‍ट्र मंत्री यी यांनी चायना डेलीला सांगितले. वांगच्या भेटी दरम्यान कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी(ता.13) करण्‍यात आले.
चीनने मोठ्या प्रमाणावर राजनै‍त‍िक मोहिम उघडली आहे. यात वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आणि नवी दिल्लीचा समावेश आहे. दिल्लीतील कार्यालयात एकूण 300 कर्मचारी आहेत.इस्लामाबादमधील नवीन कार्यालयाचा मुख्‍य उद्देश चीन आणि पाकिस्तानमधील मैत्रीचे संबंध सर्वकाळ घट्ट असावे. सध्‍या हा देश अब्जावधी रुपयांचे पा‍क व्याप्त काश्‍मीरमधून इकॉनॉमिक कॉरिडॉर उभारणार आहे.